IND vs SA 1st ODI : कुलदीप यादवचा विकेट्सचा 'चौकार', रोमांचक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी केला पराभव
IND vs SA 1st ODI Scorecard Update Marathi : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे.
LIVE

Background
India vs South Africa 1st ODI Live Cricket Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज रांची येथे खेळला जात आहे. दोन वर्षांच्या अनुपस्थितीनंतर यष्टीरक्षक केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
IND vs SA 1st ODI : कुलदीप यादवचा विकेट्सचा 'चौकार', रोमांचक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी केला पराभव
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला.
रांची येथे खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दोन्ही डावात एकूण 681 धावा झाल्या.
ज्यामध्ये विराट कोहलीने त्याचे 83 वे आंतरराष्ट्रीय शतक आणि 52 वे एकदिवसीय शतक ठोकले.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 349 धावा केल्या.
प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिका लक्ष्यापासून 17 धावांनी कमी पडली.
भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार बळी घेतले.
IND vs SA 1st ODI Live : कुलदीपच्या फिरकीने फसले जॅनसेन अन् ब्रीट्झके
कुलदीप यादवने भारताला सामन्यात परत आणले.
त्याने मार्को जॅनसेन (70) आणि मॅथ्यू ब्रीट्झके (72) यांना 32व्या षटकात बाद केले.
दोघांनी 97 धावांची भागीदारी केली.




















