Indian Womens Cricket Team Coach: मुंबईचा माजी खेळाडू भारतीय महिला संघाला देणार क्रिकेटचे धडे, अमोल मुजुमदारकडे नवी जबाबदारी
Indian Womens Cricket Team Coach: भारतीय महिला क्रिकेट संघाला नवे प्रशिक्षक मिळाले असून मुख्य प्रशिक्षक पदी अमोल मुझुमदार यांची निवड करण्यात आली आहे.
Indian Womens Cricket Team Coach: मुंबईचा माजी खेळाडू अमोल मुजुमदार (Amol Mujumdar) भारतीय महिला क्रिकेट संघाचे (Indian Womens Cricket Team) मुख्य प्रशिक्षक (Head Coach) बनणार आहे. सोमवारी (3 जुलै) रोजी ज्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली होती त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यामध्ये अमोलची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय अमोलने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडली आहे.
आता अमोलकडे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रमेश पोवार हे वादाच्या भवऱ्यात अडकल्यानंतर त्यांना प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोडावी लागली होती. त्यानंतर महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची जागा ही रिक्त होती.
9 जुलैपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यापूर्वी मुजुमदारकडे संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. या दौऱ्यात भारतीय संघ मिरपूरमध्ये तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये चांगल्या स्थितीत असूनही महिला क्रिकेट संघाच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे मुजुमदारकडे दोन वर्षांसाठी ही जबाबदारी येण्याची शक्यता आहे. दरम्यान 2024 सप्टेंबरमध्ये बांगलादेशात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताला आयसीसीचे पहिले विजेतेपद मिळवून देण्यासाठी मुजुमदार यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवण्यात येणार आहेत.
अमोलची क्रिकेट विश्वातली कामगिरी
आपल्या होमग्राऊंड मुंबईकडून खेळणाऱ्या अमोलचा त्याच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत. अमोलने 1994 साली त्याच्या क्रिकेटच्या क्षेत्रातल्या कामगिरीला सुरुवात केली. अमोलने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 171 सामन्यांमध्ये 11167 धावांचा विक्रम केला आहे. यादरम्यान अमोल मजुमदारची सरासरी 48.1 आणि त्याचा स्ट्राईक रेट 72.7 होता. तसेच त्याने 30 शतके झळकावली. सर्वोच्च धावसंख्या 260 इतकी आहे.
अमोलने 113 सामन्यामंध्ये 106 डावात 3286 धावा केल्या आहेत. यादरम्यान अमोलची सरासरी ही 38.2 होती तर त्याचा स्ट्राईक रेट हा 94.3 इतका होता. अमोलने 14 टी 20 सामने देखील खेळले आहेत. या 14 टी 20 सामन्यांमध्ये अमोलने 174 धावांचा दमदार खेळी केली आहे. या सामन्यादरम्यान अमोलची सरासरी ही 19.3 इतकी होती तर त्याचा स्ट्राईक रेट हा 109.4 इतका होता.
त्याने त्याच्या क्रिकेटच्या करिअरला रामराम केल्यानंतर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकाचा भूमिका बजावली. आता मुंबईचा हा माजी खेळाडू भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे आता हरमप्रीत कौर हीचं कर्णधारपद आणि अमोल मुजुमदार याचं प्रशिक्षण या दोन्ही समीकरणांमुळे भारतीय महिला क्रिकेटची कामगिरी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा :
12 शिष्य, 12 पुष्प! सचिन तेंडुलकरची गुरु पोर्णिमेनिमित्त आचरेकर सरांना अनोखी मानवंदना