एक्स्प्लोर

विश्वचषक जिंकून टी20 कारकीर्द संपवण्यापेक्षा...; रोहित शर्मा-विराट कोहलीच्या निवृत्तीवर गौतम गंभीरची प्रतिक्रिया

Gautam Gambhir T20 World Cup 2024 Marathi News: टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

Gautam Gambhir T20 World Cup 2024 Team India: भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2024) 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-20 2024 विश्वचषकाचा चॅम्पियन ठरला. 2013 नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. (India Win T20 World Cup 2024) टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांमध्ये पराभव करत विश्वचषकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाचा हा शेवटचा सामना होता. तर या सामन्यासह कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 विश्वचषकमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयानंतर क्रिकेटपटू गौतम गंभीरने दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयासह संपूर्ण देश आनंदात असल्याचे गौतम गंभीरने म्हटलं आहे.

विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. दोघांच्या या निर्णयावर देखील गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे. मला रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाचे अभिनंदन करायचे आहे. संपूर्ण देश आनंदी आहे. रोहित आणि विराट हे दोघेही महान खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे. विश्वचषक जिंकून टी-20 कारकीर्द संपवण्यापेक्षा चांगले काय असू शकते. आता दोघंही एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत राहतील आणि आपलं योगदान देत राहतील, असं गौतम गंभीर म्हणाला. 

टी-20 संघाला मिळणार नवीन कर्णधार-

रोहित शर्माने रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टी-20 संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या अनेकदा भारतीय टी-20 संघाची धुरा सांभाळताना दिसला. रोहित शर्माच्या काळापर्यंत कोणत्याही टी-20 संघाचा कायमस्वरूपी कर्णधार नव्हता, मात्र आता रोहितनंतर संघाला कायमस्वरूपी कर्णधार मिळणार आहे. आता भारताच्या टी-20 संघाचा कायमस्वरूपी कर्णधार कोणाला केले जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुख्य प्रशिक्षकही बदलणार-

टी-20 विश्वचषक संपल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला. राहुल द्रविड हे तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रशिक्षक होते. आता टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये नवा प्रशिक्षक मिळणार आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, या पदाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या:

Virat Kohli-Rohit Sharma: 2 वर्ष थांबा,आता नको,पुढचा विश्वचषक भारतात; विराट-रोहितला ड्रेसिंग रुममध्ये समजवण्याचा प्रयत्न

T20 World Cup 2024: विश्वविजेता भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला; भारतात परतण्यास विलंब, महत्वाचं कारण आलं समोर!

T20 World Cup 2024: जिंकला, हसला, रडला, तिरंगा रोवला; विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे अंगावर काटा आणणारे टॉप 15 फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget