(Source: Poll of Polls)
T20 World Cup 2024 : सुपर 8 साठी अफगाणिस्तान तयार, राशिद खानचा टीम इंडियाला इशारा, म्हणाला....
T20 World Cup 2024 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 20 जून रोजी विश्वचषकात आमनासामना होत आहे. त्याआधी अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने टीम इंडियाला इशारा दिलाय.
Rashid Khan Challenge Team India : टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024 ) आता रोमांचक स्थितीमध्ये पोहचलाय. साखळी सामन्यानंतर आता सुपर 8 चा थरार सुरु होणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचा आमनासामना सुपर 8 मध्ये होणार आहे. 20 जून रोजी हे संघ भिडणार आहेत. त्याआधी अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान (Rashid Khan) यानं टीम इंडियाला खुलं आव्हान दिलेय. दरम्यान, विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा 104 धावांनी दारुण पराभव केला होता. या पराभवानंतरही राशिद खान यानं सुपर 8 साठी तयार असल्याचं सांगितलेय. राशिद खान यानं नूर अहमद याच्या गोलंदाजीचं विशेष कौतुक केलेय.
वेस्ट इंडिजविरोधात दारुण पराभव झाल्यानंतर राशिद खान म्हणाला की, "पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांमध्ये वेस्ट इंडिजने 90 धावा केल्या होत्या. आशा स्थितीमधून कमबॅक करणं कठीण होतं. तरीही आम्ही मधल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. हा खेळ प्लॅनिंगनुसार होतो, यापुढे इतकं खराब प्रदर्शन होणार नाही. यामधून आमला चांगला धडा मिळालाय. आमच्यासाठी काही गोष्टी सकारात्मकही झाल्या आहेत, जसं की नूर अहमदची गोलंदाजी." राशिदने नूर अहमद याचं कौतुक यासाठी केले की, त्यानं चार षटकात फक्त 20 धावा खर्च केल्या होत्या. इतर गोलंदाजांची मात्र धुलाई झाली होती. आशा स्थितीमध्येही त्यानं भेदक मारा केला.
बरं झालं आता पराभव झाला....
रशीद खान पुढे म्हणाला की," आमचा संघ भारताला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवातून आम्ही बरेच धडे घेतले आहेत. त्या चूका पुन्हा करणार नाही. सुपर 8 मध्ये आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करु. " राशिदने म्हणाला की, सुपर 8 मध्ये स्थान निश्चित कऱण्याचं आमचं पहिलं लक्ष होतं. त्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे. शेवटच्या साखळी सामन्यात आमचा पराभव झाला हे चांगलेय, कारण हाच पराभव नॉकआऊटमध्ये झाला असता तर परिणाम वेगळा झाला असता.
Rashid Khan "We have achieved what we wanted, to get super eight.its good that this loss happened at this stage, not in a do-or-die game"
— Sujeet Suman (@sujeetsuman1991) June 18, 2024
Team India does exactly the opposite of this,wins most of the group matches and lose in do and die or in knockouts.pic.twitter.com/dMYv6gReM9
सुपर 8 चा थरार रंगणार आहे. 20 संघापैकी 8 संघ सुपर 8 साठी पात्र ठरले आहेत. भारतीय संघासोबत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया हे संघ अ ग्रुपमध्ये आहेत. सुपर 8 मधील भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानसोबत 20 जून रोजी होणार आहे. हा सामना ब्रिजटाउनमधील केनसिंगटन ओव्हल मैदानात पार पडणार आहे.
भारताचे सुपर 8 मधील सामने कसे असतील -
20 जून - भारत विरुद्ध अफगाणिस्तान
22 जून - भारत विरुद्ध बांगलादेश
24 जून - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया