AFG vs NZ : ग्रेटर नोएडा स्टेडियमच्या खराब स्थितीबद्दल अफगाणिस्तान बोर्डाचे विधान, म्हणाले, BCCI ने आम्हाला....
NZ vs AFG Test Greater Noida Stadium : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 9 सप्टेंबरपासून ग्रेटर नोएडा येथे कसोटी सामना खेळवला जाणार होता, मात्र हा सामना अद्याप सुरू झालेला नाही.
Afghanistan vs New Zealand Test Match : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 9 सप्टेंबरपासून ग्रेटर नोएडा येथे कसोटी सामना खेळवला जाणार होता, मात्र हा सामना अद्याप सुरू झालेला नाही. या सामन्यात आतापर्यंत नाणेफेक पण झाले नाही. दोन दिवस खेळाडूंनी सामना सुरू होण्याची वाट पाहिली, मात्र सामना झाला नाही. सोमवारी नोएडामध्ये पाऊस झाला. त्यामुळे आऊटफील्ड ओलेच राहिले. त्यामुळे सामना सुरू झाला नाही. नोएडामध्ये बुधवारी आणि गुरुवारीही पावसाचा अंदाज आहे, अशा परिस्थितीत खेळ खेळणे कठीण होईल.
दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोएडा स्टेडियमबाबत निवेदन जारी केले आहे. नोएडामध्ये दोन दिवसांचा खेळ होऊ शकला नाही आणि त्यानंतर अफगाणिस्तान बोर्डाने एक लांबलचक विधान जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले की बोर्डाने फक्त नोएडामध्येच खेळण्याचा निर्णय का घेतला, तर त्यांच्याकडे आधीच तीन पर्याय उपलब्ध होते. याशिवाय बोर्डाने बीसीसीआयबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.
"आमच्याकडे फक्त एकच पर्याय उरला होता..."
आता या संपूर्ण प्रकरणावर अफगाणिस्तान बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, भारतात आमच्याकडे लखनौ, डेहराडून आणि ग्रेटर नोएडा या तीन स्टेडियम होते. दुर्दैवाने, बीसीसीआयच्या देशांतर्गत सामन्यांमुळे उर्वरित दोन स्टेडियम उपलब्ध नव्हते. UAE मध्ये खूप गरम होते, त्यामुळे आम्ही तिथे सामना ठेवू शकलो नाही. या कारणास्तव आम्ही ग्रेटर नोएडामध्ये खेळण्याचा निर्णय घेतला.
पुढे ते म्हणाले की, भारतात सध्या मान्सूनचा हंगाम असून सततच्या पावसामुळे भारताच्या देशांतर्गत क्रिकेटवरही परिणाम झाला आहे. आम्ही हवामानावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि बीसीसीआयने आम्हाला अतिरिक्त यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जेणेकरून सामना होऊ शकेल.
दिल्ली क्रिकेट स्टेडियमच्या क्युरेटर्सने सांगितले की, पावसामुळे पहिल्यांदाच इतके सामने रद्द करण्यात आले आहेत. ग्राउंड स्टाफ कठोर परिश्रम करत आहे आणि आम्हाला आशा आहे की हवामान स्वच्छ राहील आणि तीन दिवसीय सामना होईल.
हे ही वाचा -