(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhishek Sharma : पहिल्या मॅचमध्ये अपयश, लोकांनी संशय घेतला, अभिषेक शर्माच्या शतकानंतर वडिलांनी मन मोकळं केलं...
Abhishek Sharma Hundred: झिम्बॉब्वे विरुद्ध अभिषेक शर्मानं 46 बॉलमध्ये शतक नोंदवलं. मात्र, काल झालेल्या पहिल्या मॅचमध्ये अभिषेकला खातं देखील उघडता आलं नव्हतं.
Abhishek Sharma Hundred हरारे: झिम्बॉब्वे विरुद्ध अभिषेक शर्मानं (Abhishek Sharma) 46 बॉलमध्ये 100 धावांची खेळी केली. अभिषेक शर्मानं डावाची सुरुवात षटकारानं, अर्धशतक षटकार मारत आणि शतक देखील षटकार मारत पूर्ण केलं. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काल पदार्पण केल्यानंतर पहिल्याच मॅचमध्ये खातं उघडण्यास अभिषेक शर्मा अपयशी ठरला होता. अभिषेक शर्मानं आज दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये अभिषेक शर्मानं तुफानी खेळी केली. 46 बॉलमध्ये 100 धावा केल्या. भारतानं 100 धावांनी झिम्बॉब्वेला पराभूत केलं. या विजयात अभिषेक शर्मानं महत्त्वाची कामगिरी केली. अभिषेकनं या डावात 7 चौकार आणि 8 षटकार मारले. लेकाच्या शतकानंतर राजकुमार शर्मा यांनी भावनांना मोकळी वाट करुन दिली. अभिषेक शर्मानं पहिल्या मॅचमध्ये नेमकी चूक कुठं केली याबाबत त्यांनी भाष्य केलं.
राजकुमार शर्मा यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीनुसार पहिल्या मॅचमध्ये अभिषेक शर्म मॅचचा पहिला बॉल बॅटनं व्यवस्थित खेळू शकला नव्हता. बॅट आणि बॉलचं योग्य कनेक्शन झालं नव्हतं. अभिषेक शर्माला पहिल्या मॅचमध्ये देखील षटकारानं सुरुवात करायची होती. मात्र, त्याला बॉलची लेंथ समजून घेता आली नाही. मात्र, आजच्या मॅचमध्ये अभिषेक शर्मानं डावाची सुरुवात षटकारानं केली. सलग तीन षटकार मारत अभिषेक शर्मानं शतक पूर्ण केलं.
राजकुमार शर्मांनी वाढवलं लेकाचं मनोबल
राजकुमार शर्मा यांनी सांगितलं की शुन्यावर बाद झाल्यानं अभिषेक शर्मा हताश झाला होता. जेव्हा तुम्ही पदार्पणाच्या मॅचमध्ये खातं उघडू शकत नाही तेव्हा तुमच्या खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जातात. अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यानं स्वत:च्या षटकार मारण्याच्या सवयीला दोष देत होता. मात्र, मी त्याला सांगितलं की त्याला या क्षमतेमुळंच टीम इंडियात स्थान मिळालं आहे, असं राजकुमार शर्मा म्हणाले. अभिषेक शर्मानं आज झालेल्या टी 20 मॅचमध्ये देखील आक्रमक फलंदाजी केली.
आयपीएलमध्ये अभिषेक नावावर किती षटकार?
अभिषेक शर्मा IPL मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळतो. 2023 च्या तुलनेत 2024 चं आयपीएल त्याच्यासाठी फायदेशीर ठरलं. अभिषेक शर्मानं 204 च्या स्ट्राईक रेटनं 484 धावा केल्या होत्या. या हंगामात अभिषेक शर्मानं सर्वाधिक 42 षटकार मारले होते.
संबंधित बातम्या :
Abhishek Sharma : अभिषेक शर्माचं वादळी शतक, जे रोहित शर्मा-विराट कोहली जे जमलं नाही ते करुन दाखवलं