WTC Points Table: इंग्लंडने वेस्ट इंडिजला लोळवले; WTC च्या गुणतालिकेत मोठे उलटफेर, टीम इंडिया कितव्या स्थानी?
WTC Points Table: इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल केला आहे.

WTC Points Table: आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप 2023-2025 (WTC Points Table) चे सध्या पर्व सुरु आहे. आतापर्यंत विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत आणि दोन्ही वेळा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती. आता टीम इंडियाची तिसऱ्यांदा विश्व कसोटी चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याकडे आहे. याचदरम्यान विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर झाले आहेत.
इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल केला आहे. इंग्लंडच्या सलग दोन विजयांमुळे टीम इंडियाचे नुकसान होणार का? वेस्ट इंडिजकडून सलग दोन पराभवानंतर टीम इंडिया सध्या कोणत्या स्थानावर आहे, जाणून घ्या...
टीम इंडिया अजूनही अव्वल स्थानावर-
इंग्लंडचे सलग दोन विजय आणि वेस्ट इंडिजचा पराभव यामुळे टीम इंडियाला काही फरक झाला नाही. भारतीय संघ गुणतालिकेत अजूनही अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाची सर्वाधिक 68.51 विजयाची टक्केवारी आहे.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघ टॉप-5 मधून बाहेर-
सलग दोन कसोटी जिंकूनही इंग्लंड गुणतालिकेत टॉप-5 मधून बाहेर आहे, तर वेस्ट इंडिज 9व्या स्थानावर आहे. इंग्लंडने आतापर्यंत 12 पैकी 5 कसोटी जिंकल्या आहेत, ज्यात त्यांची विजयाची टक्केवारी 31.25 आहे. तर वेस्ट इंडिजने आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त 1 जिंकता आला आहे. वेस्ट इंडिजची विजयाची टक्केवारी 22.22 आहे.
टॉप-5 संघ कोणते?
टीम इंडिया अव्वल क्रमांकावर आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 6 जिंकले, 2 सामन्यात पराभव आणि 1 सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने 12 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 8 जिंकले आणि 2 गमावले, तर एक सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 62.50 आहे. त्यानंतर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. किवी संघाने 6 कसोटी खेळल्या आहेत, ज्यात 3 जिंकल्या आणि 3 गमावल्या. न्यूझीलंडची विजयाची टक्केवारी 50 आहे. त्यानंतर श्रीलंका गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. लंकेने आतापर्यंत 4 कसोटी खेळल्या आहेत, 2 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. पाकिस्तानने 5 कसोटी खेळल्या आहेत, ज्यात 2 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 36.66 आहे.
पाहा विश्व कसोटी चॅम्पियनशिपची गुणतालिका-
A big jump in the #WTC25 standings for England after another win over the West Indies 🏏
— ICC (@ICC) July 22, 2024
More from #ENGvWI 👇https://t.co/LREM4HkQPh
संबंधित बातम्या:
रंगेहाथ पकडलं अन्...; हार्दिक पांड्याच्या चुकीची शिक्षा नताशा भोगतेय?, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
