(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 2023 : मोहम्मद शामीचा चेंडू म्हणजे बंदुकीची गोळीच, दिग्गज गोलंदाजाने केले कौतुक
Simon Doull Praise Mohammed Shami : मोहम्मद शामी तुफान फॉर्मात आहे, दोन सामन्यात नऊ विकेट घेऊन विश्वचषकात खळबळ माजवली आहे.
Simon Doull Praise Mohammed Shami : मोहम्मद शामी तुफान फॉर्मात आहे, दोन सामन्यात नऊ विकेट घेऊन विश्वचषकात खळबळ माजवली आहे. पहिल्या चार सामन्याची कसर शामीने दोन सामन्यात भरुन काढली आहे. लखनौ आणि धरमशालाच्या मैदानावर शामीच्या चेंडूचा सामना करणं इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांना जमत नव्हते. शामी वाऱ्याच्या वेगाने आणि अचूक टप्प्यावर मारा करत होता. शामीचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डूल यांनाही शामीचे तोंडभरुन कौतुक केलेय. शामीचा चेंडू म्हणजे बंदुकीच्या गोळीसारखा असल्याचे सायमन डूल यांनी म्हटलेय. सायमन डूल यांनी शामीचे भरभरुन कौतुक केलेय.
न्यूझीलंडचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज सायमन डूल यांचा व्हिडीओ आयसीसीने पोस्ट केलाय. यामध्ये सायमन डूल शामीचे कौतुक करताना दिसत आहेत. ते म्हणाले की, मोहम्मद शामीची गोलंदाजी मला आवडते. त्याने पहिल्यांदाच असा पराक्रम केला नाही. तो संघातून बाहेर जातो आणि परत येतो. कमबॅक केल्यानंतर तो आणखी शानदार कामगिरी करतो. याची गोलंदाजीची शैली मला प्रचंड आवडते. तो ज्या सीम पोझिशनने गोलंदाजी करतो ती क्रिकेटमधील सर्वोत्तम आहे. मला वाटते की तो एखाद्या बंदुकीसारखा आहे, त्याची गोलंदाजाही भेदक आहे. आता कदाचित त्याने संघातील स्थान बळकट केलेले असेल. हार्दिक पांड्याशिवाय भारत पाच गोलंदाजांचा सामना करू शकतो का? हो नक्कीच करु शकतात."
Simon Doull said, "I love Mohammad Shami. He's an absolute gun bowler". pic.twitter.com/au3DIcDEZQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 31, 2023
Cricket World Cup 2023 - "He Is An Absolute Gun": Simon Doull Hails Mohammed Shamihttps://t.co/IMfIeyJKmX
— Kyler (@Kyler1359812476) October 31, 2023
पहिल्या चार सामन्यात बेंचवर, हार्दिकच्या दुखापतीनंतर संधी
विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यात मोहम्मद शामीला बेंचवर बसवण्यात आले होते. शार्दुल ठाकूर याला रोहित शर्माने प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले होते. पण बांगलादेशविरोधात हार्दिक पांड्याला दुखापत झाली. पांड्याची दुखापत मोहम्मद शामीच्या पथ्थ्यावर पडली. हार्दिक संघाबाहेर गेल्यामुळे टीम इंडियाला दोन बदल करावे लागले. हार्दिक पांड्याच्या जागी सूर्याला स्थान दिले तर शार्दूलच्या जागी शामीला स्थाने दिले. न्यूझीलंड आणि इंग्लंडविरोधात शामीने 9 विकेट घेतल्या.
शामीने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला. न्यूझीलंड विरुद्धच्या विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात शामीने 5 विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. त्यानंतर शामीने इंग्लंडविरुद्ध चार विकेट घेतल्या. त्याने दोन सामन्यात 9 विकेट घेतल्यात.