England vs Sri Lanka : विश्वविजेत्या इंग्लंडची चाचपडण्याची मालिका सुरुच; 27 वर्षांचा इतिहास कायम ठेवण्यासाठी श्रीलंकेची दमदार सुरुवात!
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी इंग्लंडने घेतली. सलामीवीर जाॅनी बेअरस्टाॅ आणि डेव्हीड मलानने 39 चेंडूत 45 धावांची सलामी दिली होती. मात्र, इंग्लंडचा डाव त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
Cricket World Cup 2023: क्रिकेट विश्वचषक 2023 मधील 25 वा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेत दोन्ही संघांची अवस्था बिकट आहे. या विश्वचषकात या दोन्ही संघांनी आतापर्यंत 4-4 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 1-1 सामने जिंकता आले आहेत.
England today:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2023
First 6.1 overs - 45/0.
Next 8.5 overs - 32/4.
- A super comeback by Sri Lanka! pic.twitter.com/n7Ebj5jNso
इंग्लंडची चाचपडण्याची मालिका सुरुच
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या इंग्लंडने चांगली सुरुवात केली. सलामीवीर जाॅनी बेअरस्टाॅ आणि डेव्हीड मलानने 39 चेंडूत 45 धावांची सलामी दिली होती. मात्र, इंग्लंडचा डाव त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. बिनबाद 45 वरून इंग्लंडचा डाव 5 बाद 85 असा कोलमडला. बेअरस्टाॅ 30 धावांवर बाद झाला, तर मलान 28 धावांवर बाद झाला. ज्यो रुट तीन धावांवर धावबाद झाला. बटलर 8 धावांवर, तर लिव्हिंगस्टोन एका धावेवर परतला.
England have won the toss and they've decided to bat first.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2023
In - Moeen, Livingstone and Woakes.
Out - Brook, Topley and Atkinson. pic.twitter.com/vVCzI3VUIE
27 वर्षांचा इतिहास कायम ठेवण्यासाठी श्रीलंकेची दमदार सुरुवात!
इंग्लंडला झटपट पाच धक्के दमदार सुरुवात करताना 27 वर्षांचा इतिहास कायम ठेवण्यासाठी दमदार सुरुवात केली आहे. 1996 पासून इंग्लंडला श्रीलंकेचा पराभव करता आलेला नाही. त्यामुळे आजही श्रीलंकेनं दमदार सुरुवात इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिले आहेत.
England last won an ICC Cricket World Cup match against Sri Lanka in 1999.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2023
They've lost 4 consecutive World Cup matches against Sri Lanka. pic.twitter.com/vTo4RqMz1z
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (wk/c), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.
England 45 for 0 to 85 for 5....!!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) October 26, 2023
- WORLD CHAMPIONS HOPES ARE GETTING DOWN. pic.twitter.com/qZzLXJGK2y
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन
पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (डब्ल्यूके/सी), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महिश थेक्षाना, कसून राजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.
इतर महत्वाच्या बातम्या