एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
या दिग्गजाचा मुलगा स्वतःचा देश सोडून ऑस्ट्रेलियासाठी खेळणार
ऑस्ट्रेलियात आपल्या गोलंदाजीची एक वेगळी निर्माण केलेला उस्मान कादिर आता पिवळ्या जर्सीमध्ये दिसू शकतो.
इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेटमधील भ्रष्टाचार आणि राजकारणाला वैतागून पाकिस्तानचे दिग्गज फिरकीपटू गोलंदाज अब्दुल कादिर यांचा मुलगा ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याच्या विचारात आहे. ऑस्ट्रेलियात आपल्या गोलंदाजीची एक वेगळी निर्माण केलेला उस्मान कादिर आता पिवळ्या जर्सीमध्ये दिसू शकतो.
पाकिस्तानच्या निवडकर्त्यांकडून सतत दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर 2020 च्या टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा विचार करत असल्याचं स्वतः उस्मान कादिरने म्हटलं आहे. अंडर-19 विश्वचषक संपला तेव्हा 2012 सालीच ऑस्ट्रेलियाकडून नागरिकत्वाची ऑफर मिळाली होती. मात्र तेव्हा वडिलांमुळे (अब्दुल कादिर) नकार दिला होता. आता पुन्हा एकदा यावर विचार करत आहे, असं उस्मान कादिरने सांगितलं.
पाकिस्तानच्या अंडर-19 संघात चांगली कामगिरी केल्यानंतर राष्ट्रीय संघात निवड होईल, अशी वडिलांना अपेक्षा होती. मात्र असं न झाल्यामुळे आता ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा विचार करत असल्याचं उस्मान कादिरने म्हटलं आहे.
पाकिस्तानमधील एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, ''ऑस्ट्रेलियाला जात असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला तेव्हाच सांगितलं होतं. त्यानंतर 2013 साली पाकिस्तानच्या संघात समावेश करण्यात आला. मात्र संघ रवाना होण्यापूर्वीच विनाकारण संघातून नाव वगळण्यात आलं,'' असं उस्मान कादिर म्हणाला.
उस्मान कादिर सध्या सिडनीत सुरु असलेल्या न्यू साऊथ वेल्स प्रीमिअर क्रिकेटच्या ग्रेड ए लीगमध्ये हॉक्सबरी क्रिकेट क्लबकडून खेळत आहे. ज्यामध्ये त्याने 9 सामन्यात तीन वेळा 5 पेक्षा जास्त विकेट घेत 30 विकेट नावावर केल्या आहेत.
उस्मानने पाकिस्तानच्या 8 प्रथम श्रेणी सामन्यांचं प्रतिनिधित्व केलं आहे, ज्यात 7 विकेट घेतल्या होत्या. तर लिस्ट ए च्या 17 सामन्यांमध्ये 15 विकेट त्याच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये उस्मानला अनेक दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement