Mohammad Rizwan : ज्या वकिलाच्या तक्रारीनं पाकिस्तानी महिला अँकरला भारत सोडून जावं लागलं, त्याच वकिलाची आता मोहम्मद रिझवानविरोधात तक्रार!
मोहम्मद रिझवान वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तोच रिझवान आता मैदानावर केलेल्या एका कृतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : भारताने हायहोल्टेज सामन्यात पाकिस्तानचा (India Vs Pakistan) धुव्वा उडवत सलग तिसऱ्या विजय नोंदवला. या सामन्यात पाकिस्तानकडून कॅप्टन बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) सोडून एकाही फलंदाजाची भारताविरोधात डाळ शिजली नाही. रिझवान वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तोच रिझवान आता मैदानावर केलेल्या धार्मिक कृतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan Namaz Controversy) पाकिस्तान-नेदरलँड सामन्यादरम्यान भर मैदानावर नमाज अदा केली होती. आता याविरोधात आयसीसीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल यांनी मोहम्मद रिझवान विरोधात आयसीसीकडे तक्रार केली आहे. विनीत जिंदाल यांनी आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, मोहम्मद रिजवानने मैदानावर नमाज अदा करणे हे खेळाच्या विरोधात आहे.
— zainab abbas (@ZAbbasOfficial) October 12, 2023
सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल कोण आहेत?
सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदालही अलीकडेच चर्चेत होते. विनीत जिंदाल यांनी पाकिस्तानी अँकर झैनाब अब्बास विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी विनीत जिंदाल म्हणाले होते की, झैनाबने आपल्या ट्विटने भारतीय आणि हिंदू धर्माला दुखावले आहे. त्यानंतर झैनाबला भारत सोडावा लागला होता. मात्र, मोहम्मद रिझवानने मैदानावर नमाज अदा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी मोहम्मद रिजवाननेही मैदानावर नमाज अदा केली होती.
View this post on Instagram
मोहम्मद रिझवानच्या गाझा ट्विटवर आयसीसी काय म्हणाली?
मोहम्मद रिझवानने गाझाच्या समर्थनार्थ सुद्धा ट्विट केले होते. त्यानंतर हे प्रकरण आयसीसीपर्यंत पोहोचले. मात्र, आयसीसीने कोणतीही कारवाई करण्यास स्पष्ट नकार दिला. आयसीसीने म्हटले आहे की, एखादा खेळाडू मैदानाबाहेर काय करत आहे हे आमच्या अखत्यारीत नाही. हा मुद्दा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अखत्यारीत येतो, असेही आयसीसीने म्हटले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हवे असल्यास मोहम्मद रिझवानवर कारवाई करू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या