(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022, table tennis Final : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाची 'सुवर्ण कामगिरी', फायनलमध्ये सिंगापूरला मात देत मिळवलं GOLD
CWG 2022: भारताच्या पुरुष संघाने टेबल टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये सिंगापूरला 3-1 च्या फरकाने मात देत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने आपली आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत विजय मिळवला.
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने पाचवं सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे. हे पदक भारताने टेबल टेनिस खेळाच्या पुरुष टीमच्या स्पर्धेत निश्चित केलं आहे. भारतीय टेबल टेनिस पुरुष संघाने अंतिम सामन्यात सिंगापूरला (India vs Singapore) मात देत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने 3-1 च्या फरकाने सिंगापूरवर विजय मिळवला.
3⃣rd GOLD FOR MEN'S TEAM 🏓🏓 at #CommonwealthGames 🔥🔥🔥#TeamIndia🇮🇳 defeat Team Singapore 🇸🇬 3️⃣-1️⃣ in the FINAL, defending their 2018 CWG 🥇
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2022
Bringing home 1️⃣1️⃣th Medal for India at @birminghamcg22
Superb Champions!!#Cheer4India#India4CWG2022
1/1 pic.twitter.com/MgIcBmMl2o
सामन्यात सर्वात आधी भारताची अप्रतिम जोडी हरमीत देसाई आणि जी साथियान यांनी सिंगापूरच्या योंग क्यूक आणि यू एन पांग यांना 13-11, 11-7 आणि 11-5 अशा तीन सेट्समध्ये मात देत भारताला सामन्यात 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सिंगापूरच्या क्लियरन्स च्यूयू याने शरथ कमलला 11-7, 12-14, 11-3 आणि 11-9 अशा फरकाने मात दिल्यामुळे सामन्यात दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आले.
अखेरच्या सामन्यात भारत विजयी
त्यानंतर तिसऱ्या सामन्यात जी. साथियान याने अप्रतिम खेळ करत कोन पांग याला 12-10, 7-11, 11-7 आणि 11-4 च्या फरकाने नमवत भारताला 2-1 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरच्या सामन्यात हरमीत देसाईने क्लियरन्स च्यूयू याला 11-8, 11-5 आणि 11-6 च्या फरकाने मात देत सामना भारताला 3-1 ने जिंकून दिला. या विजयामुळे भारताच्या नावे सलग दुसऱ्यांदा कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक झालं आहे.
हे देखील वाचा-