एक्स्प्लोर
Advertisement
वायूवेगाने विजय, पैलवान सुशीलकुमारला 80 सेकंदात सुवर्ण!
आधी महिलांच्या 53 किलो फ्री स्टाईल कुस्ती गटात बबिताकुमारी फोगटने रौप्यपदक जिंकलं. त्यानंतर महाराष्ट्रातील बीडचा पठ्ठ्या राहुल आवाराने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. मग हुकमी एक्का सुशीलकुमारनेही गोल्ड मेडल मिळवलं.
सिडनी: ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कुस्तीचं मैदान आज भारताच्या पैलवानांनी गाजवलं. बबिताकुमारी फोगट, राहुल आवारे, किरण यांनी पदकांचा पाया रचल्यानंतर, ऑलिम्पिकमधील पदकविजेता भारताचा पैलवान सुशील कुमारनेही सुवर्ण कामगिरीने कळस चढवला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुशील कुमारने 74 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्स बोथाचा पराभव केला.
सुशीलने इतक्या वेगाने कुस्ती खेळली की, अवघ्या 80 सेकंदात त्याने डाव जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्स बोथावर 10-0 ने मात करत सुशीलकुमारने अवघ्या 80 सेकंदांत पदक खिशात घातलं.
दरम्यान, 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 29 वर पोहचली आहे.
सलग तिसरं सुवर्ण
आजच्या विषयाने सुशीलकुमारने राष्ट्रकुल स्पर्धेत एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. सलग तीन वेळा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचा मान सुशीलने पटकावला.
सुशील कुमारने 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत 66 किलो वजनी गटात, तर 2014 मध्ये 74 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर सुशीलने आज ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये गोल्ड मेडल जिंकत हॅटट्रिक केली.
बीडच्या राहुल आवारेचा विजय
महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने राष्ट्रकुलचं मैदान गाजवलं. बीडचा पैलवान आणि वस्ताद काका पवार यांचा पठ्ठ्या राहुल आवारेने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कामगिरी केली. राहुलने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं. राहुलने कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशी तब्बल 15-7 अशा मोठ्या फरकाने राहुल जिंकला.
बबिताकुमारीला रौप्य
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पैलवान बबिताकुमारी फोगटने रौप्यपदकाची कमाई केली. 53 किलो फ्री स्टाईल कुस्तीत बबिताने हे पदक पटकावलं. फायनलमध्ये बबिताला कॅनडाच्या डायना विकरने पराभूत केलं. त्यामुळे बबिताचं सुवर्णपदक हुकलं. डायनाने बबिताचा 5-2 असा पराभव केला.
संबंधित बातम्या
वाघासारखी झुंज, चित्त्यासारखी झेप, पैलवान राहुलने राष्ट्रकुल गाजवलं!
सलग 3 कुस्त्या खेळून दमली, तरीही लढली, बबिताकुमारी रौप्यपदक जिंकली !
CWG 2018 : बीडचा पैलवान राहुल आवारेला सुवर्णपदक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement