एक्स्प्लोर
सामना हरल्यानंतर डिनरला ये, जाडेजाचं मॅथ्यू वेडला निमंत्रण
धर्मशाला : टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडची चांगलीच स्लेजिंग केली. कसोटी हारल्यानंतर आपल्यासोबत डिनरला येण्याचं निमंत्रण जाडेजाने मॅथ्यू वेडला दिलं आहे.
धर्मशालाच्या मैदानावर तिसरा दिवस जाडेजाने चांगलाच गाजवला. गोलंदाजी आणि फलंदाजीने त्याने कमाल करुन दाखवली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव भारताने अवघ्या 137 धावांवर गुंडाळला. या डावात मॅथ्यू वेड 25 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं आहे.
टीम इंडियाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 300 धावांचा पाठलाग करताना 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली. यामध्ये जाडेजाच्या दमदार अर्धशतकी खेळीचाही समावेश होता.
सामन्यात तुमचा पराभव झाल्यानंतर निवांतपणे सोबत डिनर करु, असं आपण मॅथ्यू वेडला म्हणाल्याचं जाडेजाने सांगितलं. जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या.
भारताला विजयासाठी दोन दिवसात 87 धावांची गरज
ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी धर्मशाला कसोटी आणि गावस्कर-बॉर्डर कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारताला दोन दिवसात 87 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी सलामीवीर मुरली विजय 6 आणि के एल राहुल 13 धावांवर खेळत होते.
उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 137 धावांत गुंडाळून टीम इंडियाला धर्मशाला कसोटीसह चार कसोटी सामन्यांची मालिकाही जिंकण्याची संधी मिळवून दिली आहे.
या कसोटीत टीम इंडियानं पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं अजिंक्य रहाणे आणि त्याच्या शिलेदारांसमोर ही कसोटी आणि मालिका जिंकण्यासाठी अवघ्या 106 धावांचं आव्हान आहे.
त्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि मुरली विजयनं भारताला तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 19 धावांची मजल मारून दिली आहे.
त्याआधी, ग्लेन मॅक्सवेलच्या 45 आणि मॅथ्यू वेडच्या नाबाद 25 धावांच्या खेळींचा अपवाद वगळला ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय आक्रमणाचा आत्मविश्वासानं मुकाबला करू शकले नाहीत.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात
भारतीय संघानं सहा बाद 248 धावांवरुन तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. आज जाडेजा आणि साहा यांनी सत्राची सुरुवात केली. जाडेजानं आपल्या शैलीत फलंदाजी करत शानदार अर्धशतक झळकावलं. तर साहानंदेखील चांगली फलंदाजी करत जाडेजाला साथ दिली. मात्र, जाडेजा बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज झटपट बाद करण्यात कांगारुंना यश आलं. भारताचा पहिला डाव 332 धावांत आटोपला.
रवींद्र जडेजानं केलेली 63 धावांची खेळी या आघाडीत महत्वाची ठरली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायननं सर्वाधिक 5 गडी बाद केले. तर कमिन्सनंही 3 बळी घेतले.
संबंधित बातम्या :
विराटच्या समर्थनार्थ बिग बी पुन्हा मैदानात, ब्रॅड हॉजला टोला
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराटने विश्रांती घेतली : ब्रॅड हॉज
विराटला ‘सॉरी’ची स्पेलिंगही येत नसेल : जेम्स सदरलँड
कर्णधार स्मिथचा खोटेपणा, डीआरएससाठी ड्रेसिंग रुमकडे इशारा!
डीआरएस वाद , बीसीसीआय-क्रिकेट ऑस्ट्रेलियात वादाची ठिणगी
ऑस्ट्रेलियन मीडियाकडून विराट कोहलीची डोनाल्ड ट्रम्प यांच्यांशी तुलना
कोहली वि. ऑस्ट्रेलियन मीडिया : विराटच्या समर्थनार्थ बिग बी मैदानात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement