Chess World Cup 2023 Final : भारताच्या प्रज्ञानानंदची झुंज अपयशी! कार्लसन झाला विश्वविजेता
Chess World Cup 2023 Final : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे.
बाकू (अझरबैजान), Chess World Cup 2023 Final : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे. भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यानी कडवी टक्कर दिली.
टायब्रेकरमध्ये विजेता ठरवण्यासाठी २५-२५ मिनिटांचे दोन सामने खेळवण्यात येतात. यातील पहिला टाय ब्रेकर सामना कार्लसन याने जिंकला होता. दुसरा सामना प्रज्ञानंद याला जिंकाणं अनिवार्य होते. पण पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या कार्लसन याचा आत्मविशावस वाढला होता. त्याने दुसऱ्या सामन्यात आपला खेळ आणखी उंचावला, त्याला प्रज्ञानानंद याच्याकडून कडवी टक्कर मिळाली, पण दुसरा सामना अनिर्णित राहिला. अखेर कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्वकप विजेता झाला.
🏆 Magnus Carlsen is the winner of the 2023 FIDE World Cup! 🏆
— International Chess Federation (@FIDE_chess) August 24, 2023
Magnus prevails against Praggnanandhaa in a thrilling tiebreak and adds one more prestigious trophy to his collection! Congratulations! 👏
📷 Stev Bonhage #FIDEWorldCup pic.twitter.com/sUjBdgAb7a
प्रज्ञानानंद याने पाच वेळच्या विश्वविजेत्या कार्लसन याच्यापुढे आपल्या सर्वोच्च खेळाचे प्रदर्शन केले. ३२ वर्षांच्या कार्लसन याने २००४ मध्ये ग्रँडमास्टर हा खिताब मिळवला तेव्हा प्रज्ञानानंद याचा जन्मही झाला नव्हता. प्रज्ञानानंद याचा जन्म २००५ मधील आहे. त्यामुळे या दोघांमधील लढाई विषम पातळीवरील असल्याचे दिसतेय. प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातील सामना रंगतदार झाला, पण अखेर अनुभवाने बाजी मारली.
International Chess Federation (FIDE) tweets, "Praggnanandhaa is the runner-up of the 2023 FIDE World Cup! Congratulations to the 18-year-old Indian prodigy on an impressive tournament! On his way to the final, Praggnanandhaa beat, among others, world #2 Hikaru Nakamura and #3… pic.twitter.com/g9Ky5VUdA4
— ANI (@ANI) August 24, 2023
प्रज्ञानानंद फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरला आहे. 18 वर्षीय वर्षीय खेळाडूचे आभार, त्याचा फायनलपर्यंतचा प्रवास दमदार होता. प्रज्ञानानंद याने FIDE चे तिकीट मिळाले आहे, असे ट्वीट फिडेने (International Chess Federation (FIDE)) केले आहे.
तब्बल 21 वर्षांनी भारतीय खेळाडूला फिडे येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची संधी होती. पण प्रज्ञानानंदची झुंज अपयशी ठरली. यापूर्वी विश्वनाथन आनंदने 2002 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा प्रज्ञानानंदाचा जन्मही झाला नव्हता.