एक्स्प्लोर
आयपीएल 11मध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सला एंट्री!

मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघावर असलेली बंदी 2018 साली उठणार आहे. त्यामुळे हो दोन्ही संघ आयपीएलच्या 11व्या मौसमात पुन्हा एकदा दिसतील.
आयपीएलच्या 11व्या मौसमात पुणे सुपरजाईंट आणि गुजरात लायन्स या दोन संघांची जागा चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स घेतील. एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयचे अधिकारी राहुल जौहरी यांच्या मते, 11व्या मौसमात फक्त आठच संघ खेळणार आहेत.
जौहरी म्हणाले की, 'चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सवर घालण्यात आलेली बंदी 2018ला संपणार आहे. पण आयपीएलमध्ये आणखी संघ वाढविण्याचा बीसीसीआयचा विचार नाही. त्यामुळे चेन्नई आणि राजस्थान हे पुढील वर्षी पुणे आणि गुजरातची जागा घेतील.'
आयपीएलच्या 9व्या मौसमात चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या दोन्ही संघातील खेळाडूंवर पुन्हा बोली लागली होती. आयपीएलच्या 11व्या मौसमासाठी संपूर्णपणे नव्यानं बोली लावण्यात येणार आहे. त्यामुळे विराट, रैना, गेल, धोनी आणि डिव्हिलिअर्स यांच्यासारखे दिग्गज खेळाडू इतर संघांसोबत खेळताना दिसू शकतात.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















