एक्स्प्लोर
कर्णधार विराट कोहलीचा खास सत्कार
दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या वार्षिक बैठकीवेळी माजी भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदी यांच्या हस्ते खास ट्रॉफी आणि दिल्ली क्रिकेट संघाची कॅप देऊन विराटचा सत्कार करण्यात आला.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक साजरं करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला दिल्ली क्रिकेट असोसिएशनतर्फे गौरवण्यात आलं.
दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या वार्षिक बैठकीवेळी माजी भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदी यांच्या हस्ते खास ट्रॉफी आणि दिल्ली क्रिकेट संघाची कॅप देऊन विराटचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विराटनं दिल्लीकडून क्रिकेट खेळतानाच्या आपल्या आठवणींना उजाळा देत दिल्लीतील युवा क्रिकेटपटूंना कसोटी क्रिकेटवरच भर देण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमात 1983 च्या विश्वचषक संघातील दिल्लीच्या मोहिंदर अमरनाथ, मदन लाल, किर्ती आझाद, चेतन चौहान या दिग्गजांसह दिल्लीचं कर्णधारपद भूषवलेल्या खेळाडूंनादेखील सन्मानित करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement