एक्स्प्लोर
मुंबईच्या मैदानात धोनीची एकच झलक, सबसे अलग!

मुंबई: टीम इंडियाच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर, महेंद्रसिंह धोनी आज पहिल्यांदाच मैदानात उतरला. मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियवरील इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात, धोनी भारताच्या अ संघाचं नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून धोनीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. एका चाहत्याने तर थेट मैदानात धाव घेऊन, धोनीच्या पाया पडला. दुसरीकडे धोनी जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा आख्खं मैदाना उभं राहून, धोनी धोनी नावाचा गजर सुरु झाला. धोनी, युवराजचा धमाका इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारताच्या अ संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने धमाका केला. धोनीने 40 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 68 धावा ठोकल्या. अंबाती रायडूचं शतक, शिखर धवनच्या 63 आणि सिक्सर किंग युवराज सिंहच्या 56 धावांच्या जोरावर, भारताच्या अ संघाने निर्धारित 50 षटकात 4 बाद 304 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरील या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताकडून सलामीसाठी मनदीप सिंह आणि शिखर धवन आले. मनदीप 8 धावा करुन माघारी परतला. तर धवनने 84 चेंडूत 63 धावा केल्या. अंबाती रायुडूने 97 चेंडूत 11 चौकार आणि षटकाराच्या सहाय्याने शतक झळकावलं आणि तो रिटायर्ड हर्ट झाला. दुसरीकडे टीम इंडियात परतलेल्या युवराज सिंहने 48 चेंडूत 56 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने सहा चौकार आणि 2 षटकारांची बरसात केली. चाहत्यांची मोठी गर्दी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि इंग्लंड संघांमधल्या सराव सामन्यातसाठी मोठी गर्दी उसळली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात भारत ‘अ’ संघाचं नेतृत्त्व करतो आहे. एका आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनीचा हा अखेरचा सामना आहे. त्यामुळं या सराव सामन्याला दहा हजारांहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली आहे. ब्रेबॉर्नवर विनामूल्य प्रवेशाचा मुंबईकरांनी लाभ घेतला असून धोनीचे चाहते स्टेडियममध्ये अधूनमधून धोनी धोनी नावाचा पुकार करताना दिसतायत. एका चाहत्यानं तर थेट खेळपट्टी गाठली आणि तो धोनीच्या पायाही पडला. धोनीविषयी लोकांच्या मनातलं प्रेम या सामन्याच्या निमित्तानं दिसून येतंय. संबंधित बातम्या
कर्णधार धोनी आणि युवराजचा धमाका, सराव सामन्यात अर्धशतकं
आणखी वाचा























