मुलापेक्षा 6 वर्ष लहान मॉडेलला डेट करतेय ब्राझिलच्या स्टार फुटबॉलपटूची 52 वर्षीय आई
ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारच्या आईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर अनेक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहेत.
नवी दिल्ली : ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमार ज्युनियरची आई नादीन गोनकाल्विसने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर सोशल मीडीयावर एकच खळबळ पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टार फुटबॉलर नेमारची 52 वर्षीय आई नादीन 22 वर्षांच्या एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ही गोष्ट तिने सार्वजनिकरित्या मान्य केली आहे.
नादीनने आपल्या इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ती आणि टियागो रामोस एका बागेमध्ये उभे असलेले दिसत आहेत. फोटो शेअर करताना नादीनने लिहिलं आहे की, 'हे व्यक्त केलं जाऊ शकत नाही. तुम्ही हे जगता' यानंतर नादीनने एक हार्ट वाला इमोजी देत पोस्ट शेअर केली आहे.
नादिनचा बॉयफ्रेंड नेमारचा खूप मोठा फॅन आहे. टियागोने खुलासा केला की, त्याने 2017मध्ये पॅरिस सेंट-जर्मनच्या या सुपरस्टारला एक मेसेज पाठवला होता. त्यामध्ये त्याने लिहिलं होतं की, 'नेमार तू खूप भारी आहेस. मला माहित नाही की, तुझ्यासारख्या माणसाचा फॅन असण्याऱ्याची भावना कशी समजून घ्यावी. मी तुला खेळताना पाहतो तेव्हा मला प्रेरणा मिळते.' पुढे टियागोने लिहिलं आहे की, 'मला याची खात्री आहे की, मी एक दिवस तुला नक्की भेटणार, कारण मी एक ड्रिम बॉय आहे आणि मी माझं लक्ष्य कधीच सोडत नाही.'
नेमारची आई नदीनचा बॉयफ्रेंड नेमारचा खूप मोठा फॅन आहे. एवढचं नाहीतर तो नेमारपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. आपल्या आईच्या या नात्याबाबत नेमारलाही माहित आहे. नेमारने सोशल मीडियावरून आपल्या आईला या नव्या नात्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. नेमार म्हणाला की, 'आनंदी राहा आई, मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो. तसेच नेमारने आपल्या आईच्या बॉयफ्रेंडसोबत एक फोटोही शेअर केला आहे.
नदीनच्या बॉयफ्रेंडचं नाव टियागो रामोस आहे. तो एक कम्प्युटर गेमर आहे. दरम्यान, नेमारच्या आईने आपले पती आणि नेमारचे वडिल वॅगनर रिबेरियोशी यांच्यासोबत 2016मध्ये घटस्फोट घेतला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा आपल्या पत्नीच्या नात्याबाबत रिबेरियो यांना समजलं त्यावेळी त्यांनीही नेमारप्रमाणे नादीनला शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोनाग्रस्तांसाठी फुटबॉलचा देव सरसावला; लिओनेल मेस्सी करणार 377 कोटींची मदत