Commonwealth Games 2022 : 'मला विश्वास आहे, भारतीय खेळाडू संपूर्ण प्रयत्न करतील, माझ्याकडून सर्व संघाला शुभेच्छा' : पंतप्रधान मोदी
Commonwealth Games 2022 : बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ गेम्सना सुरुवात होत असून भारताचे 215 खेळाडू 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धेसाठी भारतीय संघ (Team India) सज्ज झाला आहे. 8 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विविध खेळांत जगभरातील टॉपचे खेळाडू सहभागी होतील. यावेळी भारताचे 215 खेळाडू 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. या सर्वांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुभेच्छा देत त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीचा विश्वास असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत कॉमनवेल्थमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले,'बर्मिंगहममध्ये 2022 च्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा. मला विश्वास आहे की आमचे खेळाडू त्यांचे सर्वोत्तम खेळ करतील आणि त्यांच्या उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शनाद्वारे भारतातील लोकांना प्रेरणा देत राहतील.'
"Best wishes to the Indian contingent at the start of the 2022 CWG in Birmingham. I am confident our athletes will give their best and keep inspiring the people of India through their stupendous sporting performances," tweets Prime Minister Narendra Modi.#CWG2022 pic.twitter.com/fgmh8k10I8
— ANI (@ANI) July 28, 2022
या स्पर्धेत भारतासह 72 देशांतील 5 हजार 54 खेळाडू यात सहभागी होतील. 11 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 20 विविध खेळांच्या 280 स्पर्धा खेळवल्या जातील. स्पर्धेतील सर्व सामन्यांच लाईव्ह ब्रॉडकास्ट सोनी पिक्चर्स नेटवर्क (Sony TV) वर केलं जाणार आहे. त्यामुळे भारतीय दर्शक Commonwealth Games 2022 चं लाईव्ह ब्रॉडकास्ट Sony TEN 1, Sony TEN 2, Sony TEN 3, Sony SIX आणि Sony TEN 4 चॅनलवर पाहू शकतात. याशिवाय कॉमनवेल्थ खेळांचं मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग Sony Liv या अॅपवर होणार आहे.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : आजपासून रंगणार कॉमनवेल्थ स्पर्धा 2022, भारतीय खेळाडूंचे सामने कधी अन् कोणाशी? वाचा सविस्तर
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारत सज्ज, कधी होणार सामने, कुठे पाहाल स्पर्धा, वाचा सविस्तर