एक्स्प्लोर
आयपीएलनंतर डिसेंबरपासून आणखी एक लीग सुरु होणार!

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल आणि तामिळनाडू प्रीमियर लीग म्हणजे टीएनपीएलनंतर यावर्षी डिसेंबरपासून बंगाल प्रीमियर लीग सुरु होणार आहे. पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली.
या लीगसाठी आयएमजी-आरशी करार करण्यात आला असून मालिकेत एकूण सहा संघ असतील. मालिकेसाठी ईडन गार्डन्ससह तीन मैदानं निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली.
पश्चिम बंगाल क्रिकेटच्या विकासासाठी ही लीग महत्वपूर्ण ठरेल. लीगसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया ऑगस्टमध्ये पार पडेल, असंही गांगुली यांनी सांगितलं.
दरम्यान आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची भारताकडे संधी आहे. दुखापतग्रस्त मनीष पांडेच्या ऐवजी संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकमुळे संघ व्यवस्थापनात फार फरक पडणार नाही, असं गांगुली यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
