एक्स्प्लोर
पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढा, बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहिणार
बीसीसीआय ई-मेल पाठवून पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढण्याचं आवाहन करणार असल्याचं कळतं.

मुंबई : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न सुरु असतानाच, आता क्रिकेटच्या मैदानावरही भारताने पाकिस्तानला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. विश्वचषकात एकीकडे भारत-पाकिस्तान सामन्यावर टांगती तलवार आहे, त्यातच आता बीसीसीआयनेही कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीबीसीआय आयसीसीला पत्र लिहून यंदा इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकातून पाकिस्तान संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे.
बीसीसीआय ई-मेल पाठवून पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढण्याचं आवाहन करणार असल्याचं कळतं. "शेजारील देश सातत्याने आपल्या जमिनीवर दहशतवादाला प्रोत्साहन देत असून भारताविरोधात दहशतवादाला आश्रय देत आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची भारताची अजिबात इच्छा नाही आणि भारत दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही," असा ई-मेलमधील मजकूर असल्याचं समजतं.
विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी मॅन्चेस्टर इथे सामना खेळवण्यात येणार आहे. विश्वचषकात भारत-पकिस्तान सामना होऊ नये, अशी इच्छा सरकारची असेल तर हा सामना होणार नाही. मात्र जर भारताने हा सामना खेळला नाही तर पाकिस्तानला संपूर्ण गुण मिळतील आणि भारतीय संघाचं नुकसान होईल," असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
तिकीटांवर उड्या
भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असली तरी 16 जून रोजी होणाऱ्या या सामन्याची तुफान उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये 25000 प्रेक्षकांची बसण्याची क्षमता असूनही तिकीटासांठी चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी बुकिंग केलं आहे.
बोर्डानेही फोटो हटवले
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने मुंबईतील आपल्या मुख्यालयातून पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित फोटो आणि स्मृती चिन्हं हटवली आहेत. याशिवाय राज्यातील अनेक क्रिकेट संघटनांनीही आपापल्या कार्यालयातून पाकिस्तानी क्रिकेटरशी संबंधित फोटो हटवले आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
सिंधुदुर्ग
धाराशिव
Advertisement
Advertisement























