एक्स्प्लोर
Eng vs Ind 1st Test : शुभमन गिलच्या कॅप्टनसीत लाज वाटावी असा विक्रम, तीन शतके तर भारतीय संघाच्या नावावर नको 'ती' नामुष्की
इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव 471 धावांवर संपुष्टात आला.
Eng vs Ind 1st Test
1/9

इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव 471 धावांवर संपुष्टात आला.
2/9

पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे, ज्यामध्ये टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
3/9

पहिल्या दिवशी सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी शतक झळकावले.
4/9

तर दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीलाच ऋषभ पंतनेही आपले शतक पूर्ण केले.
5/9

पण, असे असूनही पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे.
6/9

कसोटी क्रिकेटमध्ये हे खूप दुर्मिळ आहे, जेव्हा एका संघाचे तीन फलंदाज एका डावात शतके झळकावू शकले.
7/9

टीम इंडियाकडून लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात तीन खेळाडू शतके झळकावण्यात यशस्वी झाले. परंतु असे असूनही, भारतीय संघाचा पहिला डाव 471 धावांवर ऑलआऊट झाला.
8/9

यासह, कसोटी क्रिकेटमध्ये तीन वैयक्तिक शतके झळकावल्यानंतरही एका डावात सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम आता भारतीय संघाच्या नावावर आहे.
9/9

यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध सेंच्युरियन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या तीन खेळाडूंनी शतके झळकावली होती, परंतु त्यांचा पहिला डाव 475 धावांपर्यंत मर्यादित राहिला होता.
Published at : 21 Jun 2025 09:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
विश्व
























