एक्स्प्लोर
बीसीसीआयचा पदाधिकाऱ्यांवर खर्च की उधळपट्टी?
बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी आणि हंगामी खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांची पोलखोल
मुंबई : बीसीसीआयच्या खजिन्यातून गेल्या सव्वादोन वर्षांमध्ये पदाधिकाऱ्यांवर किती रक्कम खर्च झाली, याची जंत्रीच बीसीसीआयच्या प्रशासकांनी सर्वोच्च न्यायालयाला पाचव्या अहवालातून सादर केली आहे. त्यामुळे बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी आणि हंगामी खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांची चांगलीच पोलखोल झाली आहे.
एप्रिल 2015 ते जून 2017 या कालावधीत अमिताभ चौधरी यांच्या खर्चाचा आकडा एक कोटी 56 लाख रुपये एवढा आहे. याच कालावधीत बीसीसीआयनं अनिरुद्ध चौधरी यांच्यावर तब्बल एक कोटी 71 लाख रुपये खर्च केले आहेत.
अजय शिर्केंनी खर्चापोटी एक छदामही घेतला नाही!
सर्वोच्च न्यायालयानं सचिव पदावरून दूर केलेल्या अजय शिर्के यांनी खर्चापोटी बीसीसीआयकडून एक छदामही घेतलेला नाही, याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आलं आहे.
अमिताभ आणि अनिरुद्ध चौधरी यांनी विमानप्रवास, दैनंदिन भत्ता, हॉटेल वास्तव्य आणि परदेश दौऱ्यांसाठी परकीय चलन यांसाठी बीसीसीआयकडून हा खर्च वसूल केला आहे.
अमिताभ चौधरी (बीसीसीआयचे हंगामी सचिव) यांनी किती खर्च केला?
- विमान प्रवास खर्च – 65 लाख रुपये
- दैनंदिन भत्ता – 42.25 लाख
- बीसीसीआयच्या परदेश दौऱ्यांसाठीचं परकीय चलन – 29 लाख 54 हजार 68 रुपये
- हॉटेल वास्तव्य खर्च – 13.51 लाख रुपये
- कार्यालयीन खर्च – 3.93 लाख रुपये
- अतिरिक्त खर्च – 1.31 लाख रुपये
- विमान प्रवास खर्च – 60.29 लाख रुपये
- दैनंदिन भत्ता – 75 लाख रुपये
- बीसीसीआयच्या परदेश दौऱ्यांसाठीचं परकीय चलन – 17 लाख 64 हजार 966 रुपये
- इतर खर्च – 3.41 लाख रुपये
- टेलिफोन खर्च – 2.37 लाख रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
शिक्षण
व्यापार-उद्योग
Advertisement