एक्स्प्लोर
Advertisement
बीसीसीआयची सूत्र हाती घेतल्यानंतर सौरव गांगुली विराट-धोनीबाबत म्हणाला...
सौरव गांगुलीने बीसीसीआयची सूत्र हाती घेतल्यानंतर बीसीसीआयची एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत गांगुलीने विराट कोहलीबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज (23 ऑक्टोबर) बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यासोबत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा 33 महिन्यांचं शासन आज (23 ऑक्टोबर) संपुष्टात आलं आहे. त्यामुळे निवडून आलेले प्रतिनिधी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा कारभार सांभाळणार आहेत. यापुढे सौरव गांगुलीची नवी टीमच बीसीसीआयसाठी निर्णय घेईल.
सौरव गांगुलीने बीसीसीआयची सूत्र हाती घेतल्यानंतर बीसीसीआयची एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सौरव गांगुलीने विराट कोहलीबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सौरव म्हणाला की, विराटने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल. मी कर्णधार असताना जगमोहन दालमिया यांनी मला खूप सपोर्ट केला होता. अगदी तसाच मीही विराटला सपोर्ट करेन. यावेळी सौरवने धोनीबाबतही त्याची मतं व्यक्त केली.
सौरव गांगुली म्हणाला की, मी भ्रष्टाचारमुक्त बीसीसीआयचं आश्वासन दिलं आहे. महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. मी या खुर्चीत आहे तोवर प्रत्येकाला योग्य सन्मान मिळेल.
गांगुलीसमोरची महत्त्वाची आव्हानं
1) सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीच्या ताब्यात असलेल्या बीसीसीआयची नव्यानं घडी बसवणं.
2) विविध राज्य असोसिएशन आणि युनिट्सना नवा विश्र्वास देऊन भारतीय क्रिकेटच्या कारभाराला गती देणं.
3) आयसीसीकडून बीसीसीआयला मिळणारा निधी योग्य प्रमाणात मंजूर करुन घेणं.
4) दुहेरी हितसंबंधांच्या मुद्याची धार कमी करणं.
5) भारतीय क्रिकेटचा नवा रोडमॅप तयार करणं. विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीनं योजना आखणं.
6) महेंद्रसिग धोनीशी बोलून त्याच्या कारकीर्दीविषयी निर्णय घेणं.
7) येत्या 21 दिवसांत नव्या निवड समितीची नियुक्ती.
गांगुलीच्या नेतृत्त्वात बीसीसीआयची नवी टीम
भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला सौरव गांगुली बीसीसीआयचा 39वा अध्यक्ष ठरला आहे. त्याने अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रशासकीय समितीचं 33 महिन्यांचं शासन संपुष्टात आलं आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीची निवड एकमताने झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह बीसीसीआयचे सचिव म्हणून काम पाहतील. तर उत्तराखंडचे महिम वर्मा नवे उपाध्यक्ष, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुण धूमल खजिनदार आणि केरळचे जयेश जॉर्ज यांनी संयुक्त सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
आरोग्य
Advertisement