एक्स्प्लोर

पिच क्युरेटर साळगावकर निलंबित, मॅच होणारच!

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा नियोजित वन डे सामना होणारच अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई/पुणे: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर, पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं निलंबन करण्यात आलं आहे. शिवाय त्यांना पुणे स्टेडियमवर येण्यासही मज्जाव करण्यात आला. मात्र भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा नियोजित वन डे सामना होणारच अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी के खन्ना यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख नीरज कुमार यांना याबाबतची माहिती दिली असून, पुणे टीमच्या संपर्कात राहण्याचे आदेश दिला आहेत. शिवाय बीसीसीआयच्या त्रयस्थ क्युरेटरकडून खेळपट्टीची पाहणी केली आहे. पिचमध्ये काहीही गडबड नाही, त्यामुळे नियोजित सामना होऊ शकेल, असा विश्वास सी के खन्ना यांनी व्यक्त केला. https://twitter.com/ANI/status/923077374886866944 पिच क्युरेटर साळगावकरांचं धक्कादायक स्टिंग भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं धक्कादायक स्टिंग ऑपरेशन ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने समोर आणलं आहे. या स्टिंगमध्ये बॅटिंगसाठी चांगलं पीच तयार करण्यासाठी पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख आहे. बीसीसीआयनं या वृत्ताची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी करण्याची घोषणा केली आहे. तसंच पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांना निलंबित करण्यात येईल, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं. दरम्यान पांडुरंग साळगावकरांच्या स्टिंगमुळे आज होणारी मॅचही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅमेऱ्यावर पिच क्युरेटर काय म्हणाले? पत्रकाराने पिच क्युरेटरला आपल्या दोन खेळाडूंसाठी पिचमध्ये काही बदल करण्यास सांगितलं, त्यावर पांडुरंग साळगावकर लगेचच तयार झाले. जे पिच आम्ही तयार केलंय, त्यावर 337 धावसंख्या होऊ शकते. या आव्हानाचा सहजरित्या पाठलाग करता येऊ शकतो, असं पिच क्युरेटर म्हणाले. रिपोर्टरच्या सांगण्यावरुन पांडुरंग साळगावकर त्यांना पिच दाखवण्यासही तयार झाले. मात्र नियमानुसार, सामन्याआधी पिचवर कर्णधार आणि प्रशिक्षकाशिवाय कोणीही जाऊ शकत नाही. तसंच मी काही मिनिटांत पिचचं स्वरुप बदलू शकतो, असंही पिच क्युरेटर म्हणाले. पिचवर जर थोडी माती किंवा पाणी टाकलं किंवा पिचवर बुटं घासली तरी पिच खराब होऊ शकते. इतकंच नाही तर खिळे असलेले शूज घालून पिचवर जाण्यासही त्यांनी परवानगी दिली. पुण्याचं पिच कसं आहे? पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचं पिच फिरकी गोलंदाजांसाठी चांगलं समजलं जातं. इथे गोलंदाजांना मदत मिळते. मागच्या वेळी इथे झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी सामन्यात फिरकीपटूंचा दबदबा पाहायला मिळाला होता. मात्र पुण्याचं पिचवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल जेवढा वळत होता, तेवढा आता वळणार नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर कोणताही संघ पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेईल, कारण संध्याकाळी दव पडतं, त्यावर सामन्याचा निकाल ठरु शकतो. पुण्यात MCA स्टेडियमवर आतापर्यंत दोन सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आतापर्यंत टीम इंडियाने दोन वन डे सामने खेळले आहेत. यापैकी एका सामन्यात टीम इंडिया विजयी झाली आहे, तर एका सामन्यात पराभूत. 2013 साली खेळलेल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 72 धावांनी पराभूत केले होते. तर यंदा जानेवारी महिन्यात इंग्लंड विरोधातील सामन्यात भारताने 3 विकेट्सने विजय मिळवला होता. कोण आहेत पांडुरंग साळगावकर? पांडुरंग साळगावकर हे माजी रणजीपटू आहेत. 1971-72 ते 1981-82 या कालावधीत महाराष्ट्रासाठी त्यांनी रणजी सामने खेळले. साळगावकरांनी जलदगती गोलंदाज म्हणून रणजी सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. 1971-72 या पदार्पणाच्या रणजी सामन्यांमध्ये साळगावकरांनी 15 विकेट्स घेतल्या होत्या. इराणी कपमध्येही त्यांनी ‘रेस्ट ऑफ इंडिया’साठी बॉम्बेविरोधात सामने खेळले आहेत. अजित वाडेकरांसह सहा विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. जानेवारी 1974 मध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली होती. 1974-75 मध्ये दलिप ट्रॉफीच्या उपान्त्य सामन्यात इस्ट झोनचा त्यांनी धुव्वा उडवला. 1974-75 नंतर ते फक्त महाराष्ट्रासाठी रणजी खेळले. 1980-81 मध्ये बडोद्याविरुद्ध त्यांनी ठोकलेलं शतक हे त्यांच्या कारकीर्दीचं हायलाईट म्हणता येईल. निवृत्तीनंतर साळगावकर पुण्यात क्रिकेट कोचिंग अकादमी चालवतात. सध्या ते पुण्यातील ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियम’चे मुख्य पीच क्युरेटर आहेत. महाराष्ट्र रणजी टीमचे मुख्य निवडकर्ते म्हणून काम पाहिलं आहे. भारतासाठी सामना जिंकणं आवश्यक भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील दुसरा सामना आज दुपारी 1.30 वाजता पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबईतील सामन्यात सहा विकेट्सनी पराभव झाल्यानंतर आता भारतीय संघावर मालिका गमावण्याचं वादळ घोंघावत आहे. विराट ब्रिगेडसाठी या सामन्यात ‘करो या मरो’ची परिस्थिती आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पुणे वन डेमध्ये विजय आवश्यक आहे. कागदावर न्यूझीलंडचा संघ टीम इंडियापेक्षा कमकुवत वाटत असला तरी मैदानावर कोणत्याही संघाला पराभूत करण्याची धमक त्यांच्यात आहे, हे मुंबईतील सामन्यातून दिसलं आहे. संबंधित बातम्या पिच क्युरेटर साळगावकरांचं धक्कादायक स्टिंग पिच क्युरेटर स्टिंग : पुण्याचं पिच कसं आहे?  खिळ्याचे शूज घालून पिचवर, कॅमेऱ्यावर पिच क्युरेटर काय म्हणाले?  पिच क्युरेटरचं स्टिंग, कोण आहेत पांडुरंग साळगावकर?

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-3 Live : गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
LIVE सामन्यात धक्कादायक क्षण! स्टार खेळाडू अचानक जमिनीवर पडला, सगळेच घाबरले! डॉक्टरांची मैदानात धावपळ, VIDEO
LIVE सामन्यात धक्कादायक क्षण! स्टार खेळाडू अचानक जमिनीवर पडला, सगळेच घाबरले! डॉक्टरांची मैदानात धावपळ, VIDEO
Ind vs Sl 1st Test Day-3 : तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
The Hundred 2026 : बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!
बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget