एक्स्प्लोर
राजीव शुक्ला अध्यक्ष, लोढा समितींच्या शिफारसींसाठी BCCI ची नवी समिती
नवी दिल्ली: लोढा समितीच्या शिफारशी बीसीसीआयच्या प्रशासनात सहजतेनं कशा लागू करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी बीसीसीआयनं एका समितीची स्थापना केली आहे.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सात सदस्यांचा समावेश आहे. अन्य सहाजणांमध्ये बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी, खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांच्यासह सौरव गांगुली, टी. सी. मॅथ्यू, नबा भट्टाचारजी, जय शाह यांचाही समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या कठोर शिफारशींपासून बीसीसीआयला आणि संलग्न असोसिएशन्सना वाचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा आटापिटा अजूनही सुरू आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी घेण्यात आला होता.
लोढा समितीच्या शिफारशींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 14 जुलैला होणार आहे. त्यामुळं बीसीसीआयच्या नव्या समितीला आपला अहवाह किमान 10 जुलैपर्यंत तयार करावा लागणार आहे.
बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना कठोर वाटत असलेल्या लोढा समितीच्या शिफारशी कोणत्या?
- एक राज्य, एक मत
- बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना 70 वर्षांची कमाल वयोमर्यादा
- सलग तीन वर्ष एखादं पद भूषवल्यानंतर प्रशासनात पुन्हा येण्यासाठी किमान तीन वर्षे सक्तीची विश्रांती.
- बीसीसीआयच्या निवड समितीत 5 ऐवजी केवळ तीनच सदस्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement