एक्स्प्लोर

INDvsAUS : भारत विजयाच्या समीप

अॅडलेड कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे.

अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत विजयासाठी भारताला तीन विकेट्सची गरज आहे. उपाहारानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला बुमराने षटकाच्या पहिल्याच बॉलवर झटका दिला. बुमराने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला 41 धावांवर माघारी धाडलं. ही ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट होती. पाचव्या दिवशी उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 बाद 186 धावा केल्या होता. 4 बाद 104 धावांवरुन पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या ईशांत आणि बुमराने झटके दिले. ईशांतने ट्रॅव्हिस हेडला 14 धावांवर बाद केलं. त्यानंतर बुमराने शॉन मार्शला 60 धावांवर माघारी पाठवलं. तर उपाहारानंतर बुमरानेच टिम पेनची विकेट घेतली. अॅडलेड कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता भारताला विजयासाठी तीन विकेटसची गरज आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. भारतातर्फे जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि आर अश्विनने प्रत्येकी 2 तर ईशांत शर्माने 1 विकेट घेतली. चार दिवसात काय घडलं? ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर फिंचला 11 धावांवर अश्विनने बाद केले तर त्यांनतर आलेल्या ख्वाजाला अवघ्या 8 धावांवर अश्विननेच तंबूत धाडले. हॅरिसने 26 धावांची खेळी केली तर हॅन्डस्कॉम्ब 11 धावांवर बाद झाला. या दोघांनाही शमीने बाद केले. त्याआधी पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या पुजारानं दुसऱ्या डावातही नऊ चौकारांसह 71 धावांचं योगदान दिलं. तर रहाणेने सात चौकारांसह 70 धावांची खेळी उभारली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे टीम इंडियाला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक सहा फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्कनं तीन आणि जॉश हेजलवूडनं एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत आटोपला होता. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने एकाकी झुंज देताना सहा चौकारांसह 72 धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभारली होती. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 15 धावांचीच आघाडी घेता आली होती. टीम इंडियाचा पहिला डाव 250 धावांत आटोपला होता. भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने 123 धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात पुजारा वगळता एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mohsin Naqvi's Visit to India : 'ट्रॉफी चोर' मोहसिन नक्वी भारतात येणार; पंतप्रधानांची परवानगी मागितली, पाकिस्तानच्या दाव्याने खळबळ, नेमकं कारण काय?
'ट्रॉफी चोर' मोहसिन नक्वी भारतात येणार; पंतप्रधानांची परवानगी मागितली, पाकिस्तानच्या दाव्याने खळबळ, नेमकं कारण काय?
IPL च्या गुणतालिकेत जबरदस्त ट्विस्ट! फक्त 11 सामने बाकी, तरी प्लेऑफसाठी कोणाचंही तिकीट नाही पक्कं; 8 संघांत शर्यत, कोण मारणार बाजी?
IPL च्या गुणतालिकेत जबरदस्त ट्विस्ट! फक्त 11 सामने बाकी, तरी प्लेऑफसाठी कोणाचंही तिकीट नाही पक्कं; 8 संघांत शर्यत, कोण मारणार बाजी?
KKR vs GT LIVE score IPL 2026 : प्लेऑफसाठी KKRचा जीव टांगणीला; गिलच्या वादळासमोर रहाणेची प्रतिष्ठेची लढाई, कोण जिंकणार?
प्लेऑफसाठी KKRचा जीव टांगणीला; गिलच्या वादळासमोर रहाणेची प्रतिष्ठेची लढाई, कोण जिंकणार?
BAN vs PAK 2nd Test : पाकिस्तानच्या खेळाडूसोबत LIVE मॅचमध्ये मोठा अपघात! चेंडू अडवायला गेला अन् डोक्यावर पडला; स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर
पाकिस्तानच्या खेळाडूसोबत LIVE मॅचमध्ये मोठा अपघात! चेंडू अडवायला गेला अन् डोक्यावर पडला; स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Embed widget