Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Brett Lee on Preity Zinta: ब्रेट लीने प्रीती झिंटासोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

Brett Lee on Preity Zinta Relationship: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली (Brett Lee) भारत देशाला आपले दुसरे घर मानतो. त्याने बऱ्याचदा भारतीय संस्कृतीचे कौतुक केले आहे. तो भारतात खेळल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळला आहे. या लीगमध्ये असताना तो 2 संघांकडून खेळत होता. तो किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) (Punjab Kings) या संघाकडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या संघासोबत तो तीन वर्ष खेळला. या काळात ब्रेट लीचे नाव टीमचे सह - मालक प्रीती झिंटासोबत (Preity Zinta) जोडले जात होते. असं म्हटलं जात होतं की, दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. आता माजी क्रिकेटपटूने यावर उघडपणे भाष्य केलं आहे. 'प्रीती ही माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे', असं त्याने मुलाखतीत म्हटलंय.
प्रीती झिंटासोबतच्या नात्यावर ब्रेट ली नेमकं काय म्हणाला? (Brett Lee Breaks Silence on Dating Rumours With Preity Zinta)
त्या काळी प्रीती झिंटा आणि ब्रेट ली एकत्र दिसले होते. एकत्र कार्यक्रमातही त्यांना स्पॉट करण्यात आलं होतं. यामुळे ब्रेट ली आणि प्रीती झिंटाच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता ब्रेट लीने यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रीती झिंटासोबत कधीही रिलेशनशिपमध्ये नव्हतो, असं त्याने सांगितलं. प्रीतीसोबतचे त्याचे नाते मैत्रीपलीकडे कधीच नव्हते, असंही त्याने सांगितलं.
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ब्रेट लीने याबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. त्याचे कधीही कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीसोबत नातेसंबंध नव्हते. प्रीती झिंटाच नाही तर, त्याने कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला डेट केलेलं नाही, असं त्याने सांगितलं. त्याने मुलाखतीत सांगितलं की, 'प्रीतीसोबतचे त्याचे नाते मैत्रीपलीकडे कधीच नव्हते', असं त्याने सांगितलं.
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, ब्रेट लीने याबद्दल उघडपणे सांगितलं की, 'मी कधीही बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केलेलं नाही. लोकांना जे वाटेल ते समजू शकतात. मला ठाऊक आहे, काय सत्य आहे. त्यामुळे मला फरक पडत नाही', त्याने असंही सांगितलं की, प्रीती झिंटा ही भारतातील त्याच्या सर्वात जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहे. 2011 साली जेव्हा ब्रेट ली किंग्स इलेव्हन पंजाब सोडून कोलकाता नाइट रायडर्समध्ये गेला होता. तेव्हा एका कार्यक्रमात तो म्हणाला होता की, प्रीती त्याची चांगली मैत्रीण झाली आहे. तेव्हापासून ब्रेट ली आणि प्रीती झिंटा या दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला























