एक्स्प्लोर

Australia vs Sri Lanka : वर्ल्डकपमध्ये चाचपडत असलेल्या ऑस्ट्रेलियाची बाॅलिंग झालीय 'देवळातील घंटा'! कोणीही या वाजवून जावा

श्रीलंकेने सुद्धा दोन सामने अटीतटीच्या लढतीमध्ये गमावले आहेत, तर ऑस्ट्रेलियाची कामगिरी अजूनही त्यांच्या लौकिकाला साजेशी झालेली नाही. त्यामुळे एकंदरीत आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

लखनौ : वर्ल्ड कपमध्ये पहिले दोन सामने गमावल्याने पाच वेळेचा विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाची (Australia vs Sri Lanka) अवस्था सध्या बिकट झाली आहे. इथून पुढे त्यांचा प्रत्येक सामना हा करो वा मरो अशा स्थितीमधील असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज त्यांची लढत श्रीलंकेशी होत आहे. श्रीलंकेची अवस्था सुद्धा त्याच पद्धतीने झाली आहे.

श्रीलंकेने सुद्धा दोन सामने अटीतटीच्या लढतीमध्ये गमावले आहेत, तर ऑस्ट्रेलियाची कामगिरी अजूनही त्यांच्या लौकिकाला साजेशी झालेली नाही. त्यामुळे एकंदरीत आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. आजच्या सामन्यामध्ये श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. श्रीलंकन फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना जबरदस्त सुरुवात केली. 

सलामीवीर निसांका आणि कुसल परेरा यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावा जोडत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची हवा काढली. दोघांच्या अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंकेला दमदार सुरुवात करता आली. मात्र, दमदार सुरुवातीचा फायदा श्रीलंकन फलंदाजांना घेता आला नाही. बिनबाद 125 वरून 32 षटकांत 4 4 बाद 177 असा डाव कोलमडला आहे. दोन्ही सलामीवीर अर्धशतक करून बाद झाले. निसांका 61 धावांवर बाद झाला, तर परेरा 78 धावांवर बाद झाला. या दोन्ही विकेट पॅट कमिन्सने घेतल्या. झम्पाने दोन विकेट घेत श्रीलंकेला धक्का दिला. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाची कामगिरी त्यांच्या लौकिकाला साजेशी होत नसल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. गेल्या पाच वर्ल्डकप सामन्यांपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वच विरोधी संघ सलामीला यशस्वी ठरले आहेत. मागील सामन्यांमध्ये आजच्या सामन्यांमध्ये सुद्धा दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी 108 धावांची सलामी दिली. पहिल्या सामन्यामध्ये केवळ भारतीय संघाला सुरुवातीला हादरे देण्यात यश ऑस्ट्रेलियन गोलंदाजीला यश आले होते. 

2019 मध्ये वर्ल्डकपच्या लढतीत इंग्लंडच्या सलामीवीरांनी 124 धावा कुटल्या होत्या. तत्पूर्वी, 2019 मध्येच दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी 79 धावांची सलामी दिली होती. त्यामुळे मागील पाच सामन्यांमध्ये वर्ल्डकपच्या अनुषंगाने पाहिल्यास ऑस्ट्रेलियाची कामगिरी साजेशी झाली नाही. त्यामुळे कोणी पण या आणि मारून जावा अशी स्थिती त्यांची झाली आहे. दरम्यान, आजच्या सामन्यांमध्ये आणखी एक पराक्रम नोंदवला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकपमध्ये दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक झळकवण्याची ही पाचवी वेळ ठरली.

दोन्ही सलामीवीरांनी विश्वचषकात AUS विरुद्ध 50+ धावा 

  • ग्रॅहम गूच आणि इयान बॉथम, सिडनी 1992
  • ग्रॅमी स्मिथ आणि एबी डिव्हिलियर्स, बॅसेटेरे 2007
  • रोहित शर्मा आणि शिखर धवन, ओव्हल 2019
  • डी करुणारत्ने आणि कुसल परेरा, ओव्हल 2019
  • पी निसांका आणि कुसल परेरा, लखनौ 2023*

विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचे ५ सलामीचे सामने

  • 79 - क्यू डी कॉक आणि ए मार्कराम, मँचेस्टर 2019 (हरवले)
  • 124 - जे बेअरस्टो आणि जे रॉय, बर्मिंगहॅम 2019 (हरवले)
  • 2 - इशान किशन आणि आर शर्मा, चेन्नई 2023 (हरवले)
  • 108 - टी बावुमा आणि क्यू डी कॉक, लखनौ 2023 (हरवले)
  • 100* - पी निसांका आणि केजे परेरा, लखनौ 2023 (??)*

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget