एक्स्प्लोर
Advertisement
एशियाड 2018 : बॉक्सर अमित पंघालचा ‘सुवर्ण’ पंच
भारताने एशियाड स्पर्धेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. एशियाड 2018 च्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अमित एकमेव बॉक्सर ठरला.
जकार्ता : एशियाड स्पर्धेत भारताचा बॉक्सर अमित पंघालने आणखीन एका सुवर्ण पदकाची भर घातली आहे. 49 किलो वजनी गटात उझबेगिस्तानच्या हसनबॉय दुस्तमतॉवचा पराभव करत अमितने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. अमितने 3-2 अशा फरकाने सुवर्णपदक जिंकले.
भारताने एशियाड स्पर्धेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. एशियाड 2018 च्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अमित एकमेव बॉक्सर ठरला.
पहिल्या डावात अमितने सुरक्षित अंतर राखत बचावात्मक पवित्रा ठेवला होता. यामुळे प्रतिस्पर्धी हसनबॉयला गुण कमावता आले नाहीत. दुसऱ्या डावात अमितने आक्रमक खेळ करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. तिसऱ्या सत्रात बचाव आणि आक्रमण या दोन्ही गोष्टींचा उत्तम मेळ घालत अमितने सामना जिंकला.
सामन्यात अमितचा खेळ उल्लेखनीय झाला. त्याने अनुभवी खेळाडूला तोडीसतोड उत्तर दिले. अमितने 3-2 अशा फरकाने बाजी मारत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात अमितने फिलीपाईन्सचा प्रतिस्पर्धी कार्लो पालमवर मात केली होती.
हरियाणाच्या अमितने 2017 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. भारताने आत्तापर्यंत 66 पदकांची कमाई केली आहे. 2010 सालच्या एशियाडमध्ये भारताने 65 पदकांची कमाई होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement