एक्स्प्लोर
आशियाई स्पर्धा : 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत भारताला 'कांस्य'
अंतिम फेरीत कोरिया, मंगोलिया यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांची कडवी झुंज मोडून काढत भारतीय जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.

जकार्ता : इंडोनेशियातल्या जकार्ता आणि पालेमबांगमध्ये 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आहे. भारताचे नेमबाज अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारनं स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला पदकाची कमाई करुन दिली आहे. या जोडीनं 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे.
अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार या जोडीनं 390.2 गुणांची नोंद करत स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कांस्य पदक भारताच्या झोळीत टाकलं.
अंतिम फेरीत कोरिया, मंगोलिया यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांची कडवी झुंज मोडून काढत भारतीय जोडीने कांस्यपदकाची कमाई केली. तर चायनीज तैपेईच्या लीन यींगशीन आणि लू शाओचुआन जोडीनं सुवर्ण तर चीनच्या झाओ आणि यांगनं रौप्यपदक पटकावलं.
18व्या आशियाई स्पर्धांचा उद्घाटन सोहळा शनिवारी जकार्ता येथे पार पडला. गिलोरा बंग कार्नो स्टेडियमवर हा कार्यक्रम झाला. भारताचे 572 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. इंडोनेशियात जकार्तातीली पालेमबांग येथे या स्पर्धा होत आहेत.
संबंधित बातमी
45 देश, 36 खेळ, 572 खेळाडू आणि लक्ष्य एकच... एशियाडचं पदक
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















