एक्स्प्लोर

Shakib al Hasan: आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य!

Asia Cup 2022: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium)  बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात (Bangladesh vs Sri Lanka)  काल (1 सप्टेंबर 2022) खेळण्यात आलेला सामना अशिया चषकातील आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना ठरला.

Asia Cup 2022: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium)  बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात (Bangladesh vs Sri Lanka)  काल (1 सप्टेंबर 2022) खेळण्यात आलेला सामना अशिया चषकातील आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना ठरला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं बांगलादेशचा दोन विकेट्सनं पराभव करून सुपर-4 मध्ये स्थान मिळवलं. श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर बांगलादेशच्या संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलंय. दरम्यान, आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनची (Shakib al Hasan) मोठी प्रतिक्रिया आलीय.

शाकीब अल हसन काय म्हणाला?
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसननं श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाचं कौतुक केलं. या खेळाडूनं उत्कृष्ट खेळाचं दृश्य मांडल्याचं त्यानं म्हटलंय. "आम्हाला लवकर विकेट घ्यायच्या होत्या. परंतु, गोलंदाजांना त्यांनी बनवलेल्या प्लॅनिंगनुसार गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळं फिरकीपटूला अखेरचं षटक टाकवं लागलं. आमचा संघ गेल्या सहा महिन्यापासून खराब फॉर्मशी झुंज देतोय. पण आशिया चषकाच्या दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही चांगली खेळी केली." टी-20 विश्वचषकाबाबत म्हणाला की, विश्वचषकात आमच्यासमोर एक वेगळं आव्हान असेल. आम्हाला आमच्या खेळात आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या चाहत्यांसाठी निराश आहोत.

थरारक सामन्यात श्रीलंकेचा बांगलादेशचा विजय
आशिया चषकातील पाचव्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाला गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर बांगलादेशच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून श्रीलंकेसमोर 184 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्त्युत्तरात श्रीलंकेच्या संघानं दोन विकेट्स राखून हा सामना जिंकला. याविजयासह श्रीलंकेच्या संघानं सुपर-4 मध्ये एन्ट्री केलीय. तर, बांगलादेशच्या संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. 

सुपर-4 मध्ये स्थान मिळवलेले संघ
आशिया चषकातील सुपर-4 मध्ये आतापर्यंत तीन संघांनी एन्ट्री केलीय. सर्वात प्रथम 'ब' गटातून अफगाणिस्तानच्या संघानं सुपर- 4 मध्ये धडक दिली. त्यानंतर  'अ' गटातून भारतानं पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव करत सुपर-4 मध्ये स्थान मिळवलं. आता श्रीलंकेचा संघही सुपर-4 मध्ये पोहचलाय. आज हाँगकाँग आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर सुपर-4 चा चौथा संघही निश्चित होणार आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Atul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaMamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Embed widget