(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PAK vs SL: शादाब खान, नसीम शाहची पाकिस्तानच्या संघात एन्ट्री; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
PAK vs SL Playing 11: आशिया चषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात (Asia Cup 2022 Final) श्रीलंका आणि पाकिस्तान (Sri Lanka vs Pakistan) आमने- सामने आहेत.
PAK vs SL Playing 11: आशिया चषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात (Asia Cup 2022 Final) श्रीलंका आणि पाकिस्तान (Sri Lanka vs Pakistan) आमने- सामने आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. श्रीलंकेच्या संघानं आतापर्यंत पाच वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावलं आहे आणि तो या स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. तर, पाकिस्ताननं आतापर्यंत दोनदा आशिया चषक जिंकला असून आता तिसर्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या त्यांचा प्रयत्न असेल.
पाकिस्तानच्या संघात दोन बदल
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघाल दोन बदल करण्यात आले आहेत. उस्मान आणि हसनला विश्रांती देण्यात आली आहे. तर, त्यांच्या ऐवजी शादाब खान आणि नसीम शाहला संघात संधी देण्यात आली आहे. दुसरीकडं, श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही.
श्रीलंका-पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 22 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले. यातील 13 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं विजय मिळवलाय. तर, 9 सामने श्रीलंकानं जिंकले आहेत. पण गेल्या 5 सामन्यांबद्दल बोलायचं झाले तर श्रीलंका अधिक प्रभावी ठरलाय. श्रीलंकेनं गेल्या 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत.
आशिया चषका विजेत्या संघाची यादी
दरम्यान, 1983 पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून 14 वेळा आशिया चषक स्पर्धा पार पडलीय. भारतीय संघ आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानं आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजेच सात वेळा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं पाच वेळा आशिया चषक जिंकलाय. या यादीत पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांना दोन वेळा आशिया चषक जिंकता आलाय.
संघ-
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन:
पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकिपर), दनुष्का गुनाथिलका, धनंजया डी सिल्वा, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, महेश थेक्षाना, दिलशान मदुशन
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, शादाब खान, आसिफ अली, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन.
हे देखील वाचा-