![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Virat Kohli: आशिया चषकापूर्वी विराट कोहलीला धोनीची आठवण, इन्स्टाग्रामवर लिहिली खास पोस्ट!
Asia Cup 2022: यूएईमध्ये (UAE) येत्या 27 ऑगस्टपासून रंगणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघ सज्ज झालाय.
![Virat Kohli: आशिया चषकापूर्वी विराट कोहलीला धोनीची आठवण, इन्स्टाग्रामवर लिहिली खास पोस्ट! 'Most enjoyable period of my career' Virat Kohli breaks the internet with heartwarming tribute post for MS Dhoni Virat Kohli: आशिया चषकापूर्वी विराट कोहलीला धोनीची आठवण, इन्स्टाग्रामवर लिहिली खास पोस्ट!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/8b2d31423a288bafc1edecccb9214e161661488940431266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Asia Cup 2022: यूएईमध्ये (UAE) येत्या 27 ऑगस्टपासून रंगणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. काल भारतीय संघ यूएईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सराव करताना दिसला. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) येत्या 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) इन्स्टाग्रामवर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबतचा (MS Dhoni) फोटो शेअर करून एक खास पोस्ट केलीय. "धोनीसोबत खेळणं माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा आणि रोमांचक क्षण होता", असंही विराटनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
नुकतंच विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की, "या व्यक्तीचा विश्वासू उपकर्णधार बनणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा आणि रोमांचक टप्पा होता. आमची भागीदारी माझ्यासाठी नेहमीच खास असेल. 7+18." विराट कोहलीच्या या पोस्टला मोठी पसंती मिळाली आहे. कोहलीच्या या पोस्टला आतापर्यंत 17 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
विराट कोहलीची इन्स्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
कोहलीने 2008 मध्ये धोनीच्या कर्णधारपदाखाली पदार्पण केले आणि भारतातील त्याच्या कार्यकाळात अनेक जवळचे सामने जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या धोनीनं नंतर कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्या उपकर्णधार कोहलीवर सोपवली. दरम्यान, 2014 मध्ये प्रथमच कोहली कसोटीत कर्णधार बनला. त्यानंतर त्याला एकदिवसीय आणि टी-20 संघांचं कर्णधारपदही मिळालं.
विराटच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष
यूएईमध्ये रंगणाऱ्या आशिया चषकाला 27 ऑगस्टपासून सुरुवात होईल. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 28 ऑगस्ट रोजी होईल. विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील अतिशय वाईट टप्प्यातून जात आहे. जवळपास तीन वर्षांपासून विराटची बॅट शांत आहे. त्याला या काळात एकही शतक करता आलं नाही. त्यानं आयपीएल 2022 नंतर फक्त इंग्लंड दौऱ्यावरच क्रिकेट खेळले आहे. यामुळं आगामी विश्वचषकापूर्वी त्याचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप महत्वाचं असेल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)