Asia Cup 2022 Final : श्रीलंकेच्या विजयाचं सोशल मीडियावर सेलिब्रेशन, पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांकडून मजेशीर मीम्स शेअर
PAK vs SL : आशिया कप 2022 स्पर्धेत श्रीलंका संघाने पाकिस्तानला (Pakistan vs Sri Lanka) मात देत स्पर्धा जिंकली आहे. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.
PAK vs SL, Asia Cup Final : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत श्रीलंका संघाने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला. फायनलमध्ये त्यांनी पाकिस्तान संघाला (Pakistan vs Sri Lanka) 23 धावांनी मात देत चषक जिंकला आहे. दरम्यान श्रीलंकेच्या विजयाचं श्रीलंकेसह भारतीय नेटकऱ्यांनीही दमदार सेलिब्रेशन केलं. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला श्रीलंकेनं फायनलमध्ये मात दिल्यामुळे भारतीय फॅन्सनी विविध मजेशीर मीम्मस शेअर केले आहेत...त्यातील काही मीम्स पाहूया...
Mood rn 🤣 #PakvsSL pic.twitter.com/ZFiKijIzxE
— ex. capt (@thephukdi) September 11, 2022
#AsiaCup2022Final#PAKvsSL congratulations sri Lanka
— Pawan Shukla (@Shukla8175) September 11, 2022
Love from India pic.twitter.com/WQvxL9HrYq
SPECIAL MESSAGE TO #PakistanCricket
— Amit! (@AMITZZZ_) September 11, 2022
FROM MODI JI 😂#AsiaCup2022Final #BabarAzam𓃵 #PakvsSL pic.twitter.com/HtGceTsepH
Condition of tonight's PAK vs SL Asia Cup Final. 🤝 pic.twitter.com/Ol46ETCcM5
— Vishal. (@SportyVishal) September 11, 2022
#ReleaseRizwan #PakvsSri #AsiaCup2022Final
— Shubham (@Shubham94515514) September 11, 2022
Well played
Indians Right now
Full Enjoy!! 😹😹😹😹#SLvsPAK#PakvsSL#पाकिस्तान pic.twitter.com/PSvkeEzg9t
Asia Cup 2022 funny videos 😂😜#PAKvsSL #AsiaCupFinal #AsiaCup2022Final pic.twitter.com/X6YI4XqGbF
— Cricket_Wrold (@Cric_for_lover) September 12, 2022
This is really very funny😆🤦♂️🔥🔥#PAKvsSL #SLvsPAK #BabarAzam𓃵 #AsiaCup2022 #AsiaCup2022Final pic.twitter.com/NWqqURyZ8X
— VARUN (@HeyItsMeVarun) September 12, 2022
Open up Fakhar Zaman, i just want to talk
— Ghulam_Muhayyudin_Malik 🍥 (@MuhayyudinMalik) September 11, 2022
"Pak vs SL"#AsiaCup2022Final pic.twitter.com/v5y6mVJiCW
Indian Cricket fans right now 👇👇 😜😜🤣🤣💯♥️#SLvsPAK #PakvsSL
— Virat Singh Chauhan_ (@Virat_chauhan48) September 11, 2022
#AsiaCup2022Final #Final #AsiaCupFinal #BabarAzam𓃵 pic.twitter.com/Q80nsauTL8
Indian Subcontinent right now:-#PAKvsSL #SLvsPAK #AsiaCup2022Final #PKMKBForever #SrilankaCricket pic.twitter.com/Hg9CVHzYmA
— Rakesh🇮🇳 (@Rakesh1752) September 12, 2022
23 धावांनी श्रीलंका विजयी
आशिया चषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं. सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आलं.
त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या डावातील चौथ्या चषकात कर्णधार बाबर आझम आणि फखर जमान यांच्यात रुपात संघाला दोन मोठे धक्के बसले.मात्र, त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. पण इफ्तिखार 31 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. मोहम्मद नवाजही स्वस्तात माघारी परतला. पाकिस्तानच्या डावातील 17 व्या षटकात हसरंगानं तीन विकेट्स घेऊन श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. अखेर पाकिस्तानचा संघ 147 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून प्रमोद मादुशाननं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, वानिंदु हसरंगाला तीन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, चमिका करुणारत्नेनं दोन आणि महेश तीक्ष्णानं एक विकेट्स घेतली.
हे देखील वाचा-