(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asia Cup 2022: भारताचा आज श्रीलंकेशी सामना; संभाव्य प्लेईंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज
IND vs SL Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील चौथ्या सामन्यात भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) आमने- सामने येणार आहेत.
IND vs SL Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील चौथ्या सामन्यात भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) आमने- सामने येणार आहेत. सुपर 4 फेरीतील दोन्ही संघ आपपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघासाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा असेल. या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघानं अफगाणिस्तानविरुद्ध सुपर-4 मधील सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं करण्याच्या श्रीलंकेचा प्रयत्न असेल.
खेळपट्टी आणि हवामानाचा अंदाज
भारत आणि श्रीलंकेचा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ सातत्यानं विजय मिळवत आहे. या मैदानावर मागील 19 सामन्यांपैकी 17 सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं जिंकले आहेत. गेल्या दोन सामन्यांमध्ये येथे 180+ लक्ष्य गाठण्यात आलं आहे. अशा स्थितीत आजही नाणेफेक निर्णायक भूमिकेत असेल. सध्या दुबईमध्ये खूप गर्मी आहे. भारत- श्रीलंका सामन्यादरम्यानही येथील तापमान 33 अंशांच्या आसपास राहील.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना मंगळवारी 6 सप्टेंबर ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी एबीपी माझ्याच्या वेबसाईटवर भेट देऊ शकतात. https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता
ऋषभ पंत, रवी बिश्नोई आणि दीपक हुडा यांना गेल्या वेळी भारतीय संघात संधी मिळाली. यावेळी पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कार्तिक पंतची जागा घेऊ शकतो. त्याचबरोबर आवेश खानचं पुनरागमनही निश्चित आहे.
संघ-
भारताचा संभाव्य संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
श्रीलंकेचा संभाव्य संघ:
पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित असलंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना/प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.
हे देखील वाचा-