एक्स्प्लोर

IND Vs PAK: भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीसमोर पाकिस्ताननं गुडघे टेकले; भारताला विजयासाठी 148 धावांची गरज

IND Vs PAK, Asia Cup 2022: पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं (Mohammad Rizwan) सर्वाधिक 42 धावांची खेळी केली.  त्यानंतर इफ्तिखार अहमदला (Iftikhar Ahmed) 28 धावांची खेळी करता आली. 

IND Vs PAK, Asia Cup 2022: भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं 19.3 षटकात सर्वबाद 147 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं (Mohammad Rizwan) सर्वाधिक 43 धावांची खेळी केली.  त्यानंतर इफ्तिखार अहमदला (Iftikhar Ahmed) 28 धावांची खेळी करता आली. 

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या संघानं 42 धावात दोन विकेट्स गमावले. भुवनेश्वर कुमारनं तिसऱ्याच षटकात कर्णधार बाबर आझमला (10 धावा) बाद केलं. त्यानंतर आवेश खाननं फखर जमानला (10 धावा) बाद करून माघारी धाडलं. दरम्यान, मोहम्मद रिझवान आणि  इफ्तिखार अहमदनं तिसऱ्या विकेट्ससाठी 38 चेंडूतत 45 धावांची भागेदारी केली. त्यानंतर हार्दिक पांड्यानं इफ्तिखारला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडं झेलबाद करून ही भागेदारी तोडली. इफ्तिखारनं 22 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 28 धावा केल्या. इफ्तिखारला बाद केल्यानंतर हार्दिकनं पुन्हा सीमारेषेवर रिझवानला आवेश खानकडं झेलबाद करून पाकिस्तानला चौथा धक्का दिला. रिझवाननं 42 चेंडूंत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 43 धावा केल्या. त्यानंतर हार्दिकने त्याच षटकात खुशदिल शाहलाही (2 धावा) बाद करून भारताला पाचव यश मिळवून दिलं. 

दरम्यान, पंधराव्या षटकात 97 धावा करत पाच विकेट गमावून पाकिस्तानचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर डगमगताना दिसला. यानंतर पाकिस्ताननं 112 धावांवर मोहम्मद आसिफच्या (9 धावा) रूपात सहावी विकेटही गमावली.पुढच्याच षटकात अर्शदीप सिंहनं मोहम्मद नवाज (1 धाव) बाद केलं. या सामन्याच्या 19 व्या षटकात भुवनेश्वर कुमारनं पाकिस्तान सलग दोन झटके दिले. या सामन्यात भुवनेश्वर कुमार हॅट्रिकपर्यंत पोहचला होता, पण त्याला हॅट्रिक पूर्ण करता आली नाही. भुवनेश्वर कुमारनं प्रथम शादाब खान आणि नंतर नसीम शाहला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, हार्दिक पांड्या तीन आणि अर्शदीप सिंहनं दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, आवेश खानच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.

संघ-

भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह. 
पाकिस्तान 

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Embed widget