IND vs PAK: विराट कोहलीचं अर्धशतक; भारताचं पाकिस्तानसमोर 182 धावांचं लक्ष्य
IND vs PAK, Asia Cup 2022: या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं.
IND vs PAK, Asia Cup 2022: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) अर्धशतकाच्या (44 चेंडूत 60 धावा) जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानसमोर 182 धावांचं लक्ष्य ठेवलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 181 धावा केल्या आहेत.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेली भारतीय सलामी जोडी केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी धमाकेदार सुरुवात केली. पण पॉवरप्लेपूर्वी कर्णधार रोहित (28) रौफच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारतानं पॉवर प्लेमध्ये 62 धावा केल्या. त्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसणारा राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शादाबच्या चेंडूवर बाद झाला. त्यानं 28 धावा केल्या. यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवनं भारताचा डाव सावरला. परंतु, 10 व्या षटकात नवाजने सूर्यकुमार यादवच्या (13 धावा) रुपात भारताला चौथा धक्का दिला. या सामन्यातही ऋषभ पंतला काही खास कामगिरी करता आली नाही. शादाबने पंतला (14) बाद करून दुसरी विकेट मिळवली. पाकिस्तानविरुद्ध गट सामन्यात धमाकेदार प्रदर्शन करणाऱ्या हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. त्यामुळं भारताचा निम्मा संघ 132 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
अखेरच्या षटकात पाकिस्तानचं कमबॅक
सातव्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडानं कोहलीसह 17.1 षटकांत संघाची धावसंख्या 150 वर नेली. दरम्यान, कोहलीनं हसनैनच्या चेंडूवर षटकार ठोकून या स्पर्धेतील आपलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. 19 व्या षटक टाकण्यासाठी आलेल्या नसीमने हुडाला (16) बाद करून भारताला 168 धावांवर सहावा धक्का दिला. अखेरच्या षटकात रौफनं चांगली गोलंदाजी केली. ज्यामुळं भारताला 20 षटकात सात विकेट्स गमावून 181 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून शादाब खाननं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, हारिस रौफ आणि नवाजनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.
संघ-
भारताची प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन:
मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह.
हे देखील वाचा-
Shoaib Akhtar On Virat Kohli: विराट कोहली मोडणार सचिनच्या शंभर शतकांचा विक्रम? शोएब अख्तर म्हणतोय...