IND vs HK : ऐकावं ते नवलंच! हाँगकाँगचा कॅप्टनही कोहलीचा फॅन, म्हणतोय विराटच्या फॉर्ममध्ये येण्याची वाट पाहतोय
Virat Kohli : आशिया कप स्पर्धेत बुधवारी अर्थात 31 ऑगस्टला भारत विरुद्ध हाँगकाँग सामना रंगणार आहे. या सामन्याआधी हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खान याने विराट फॉर्ममध्ये परत यावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Hong Kong Captain about Virat Kohli : युएईमध्ये सुरु आशिया कप 2022 स्पर्धेत (Asia Cup 2022) भारताचा आता सामना हाँगकाँगशी (India vs Hongkong) होणार आहे. दरम्यान या सामन्यासह संपूर्ण स्पर्धेत क्रिकेटचाहत्यांचं सर्वाधिक लक्ष माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे आहे. विशेष म्हणजे हाँगकाँगविरुद्ध सामन्यापूर्वी हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खान (Nizakat Khan) याने चक्क विराट फॉर्ममध्ये परत यावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. स्वत: विराटचा फॅन असल्याचंही त्याने य़ावेळी सांगितलं.
हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खानने विराट कोहलीच्या फॉर्मवर वक्तव्य करताना सांगितले की, ''मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. पाकिस्तानविरुद्ध विराटची महत्त्वपूर्ण खेळी होती. विराट कोहलीने पुन्हा एकदा भरपूर धावा कराव्यात अशी माझी इच्छा आहे. त्याने फॉर्ममध्ये परत यावे आणि भरपूर धावा कराव्यात अशी आमची सर्वांची इच्छा आहे, असंही तो म्हणाला.
भारत विरुद्ध हाँगकाँग सामना होऊ शकतो चुरशीचा
भारत आणि हाँगकाँग सामन्याबद्दल बोलताना निझाकत खान म्हणाला की, ''आम्ही भारताविरुद्ध 2018 आशिया चषक स्पर्धेत शेवटचा सामना खेळलो होतो. आम्ही तो सामना फक्त 20 धावांनी गमावला. टी-20 सामन्यात काहीही होऊ शकते. कोणत्या षटकात गोलंदाज कधी चांगली गोलंदाजी करेल किंवा फलंदाज कधी स्फोटक धावा काढेल हे तुम्हाला माहीत नाही. आघाडीचे संघ कसे पराभूत झाले हे देखील आपण यापूर्वी पाहिले आहे. आम्ही सकारात्मक माइंडसेटने मैदानात जाणार आहोत.'' दरम्यान खानच्या या वक्तव्यावरुन भारत विरुद्ध हाँगकाँग सामना चुरशीचा होऊ शकतो.
पंतला मिळू शकते संधी
हाँगकाँगविरुद्ध ऋषभ पंतचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. या सामन्यात त्याला दिनेश कार्तिकच्या जागी संधी मिळू शकते. पंत संघात येण्याने भारतीय संघाच्या मधल्या फळीत डाव्या हाताचा पर्याय उपलब्ध करून देतो. जे संघासाठी फायदेशीर ठरू शकते. पंतशिवाय रोहित शर्मा रवीचंद्रन अश्विनचा संघात समावेश करू शकतो. भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खान पाकिस्तानविरुद्ध काही खास कामगिरी करु न शकल्याने हे बदल होऊ शकतात.
हे देखील वाचा-