IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर टीम इंडियासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, म्हणाले...
IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकातील (Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (India vs Pakistan) पाच विकेट्सनं पराभव केला.
IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकातील (Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (India vs Pakistan) पाच विकेट्सनं पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघ 19.3 षटकात 147 धावांवर ढेपाळला. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पाकिस्ताननं कडवी झुंज दिली. परंतु, अखेरच्या षटकात हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) विजयी षटकार ठोकून पाकिस्तानचा पराभव केला. भारताच्या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) टीम इंडियासाठी खास ट्वीट केलंय.
नरेंद्र मोदींचं ट्वीट-
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलंय की, "आजच्या आशिया चषक सामन्यात टीम इंडियानं अष्टपैलू कामगिरी केली. टीम इंडियानं उत्तम कौशल्य आणि संयम दाखवला. विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन."
भारताची विजयी सलामी
पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं 46 चेंडूत 49 धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्मा 12 तर, विराट कोहली 35 धावा करून बाद झाला. यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 52 धावांची भागेदारी झाली. अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झालाय. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजन सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाहनं पदार्पणाच्या सामन्यात दमदार प्रदर्शन करत भारताच्या दोन फलंदाजांना पव्हेलियनमध्ये धाडलं.
हार्दिक पांड्या विजयाचा शिल्पकार
पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयात हार्दिक पांड्याचा मोलाचा वाटा आहे. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. प्रथम गोलंदाजी करत हार्दिकनं तीन विकेट्स घेतले. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या हार्दिकनं चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं नाबाद 33 धावांची खेळी केली. तो फलंदाजीला आला तेव्हा भारतानं 15 व्या षटकात अवघ्या 89 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या.
हे देखील वाचा-