Harbhajan Singh: पंतऐवजी कार्तिकला संधी देण्याचा निर्णय योग्य की अयोग्य? हरभजन सिंहनं म्हणतोय...
Asia Cup 2022: भारतानं पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून आशिया चषकाच्या (IND vs PAK) मोहिमेला सुरुवात केलीय.
Asia Cup 2022: भारतानं पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून आशिया चषकाच्या (IND vs PAK) मोहिमेला सुरुवात केलीय. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) ऐवजी दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली. रोहितच्या शर्माच्या या निर्णायावर चाहत्यांपासून तर दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केला. मात्र, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहनं (Harbhajan Singh) रोहित शर्माचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय. दिनेश कार्तिकच्या चांगल्या फॉर्मचा भारतीय संघानं चांगला वापर केला पाहिजे, असंही हरभजन सिंहनं म्हटलंय.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं दिनेश कार्तिकवर बोली लावत त्याला संघात सामील करून घेतलं. या हंगामात दिनेश कार्तिकनं बंगळुरूच्या अनेक विजयात महत्वाचा वाटा उचलला. या हंगामात त्यानं 183 च्या स्ट्राईक रेटनं 330 धावा केल्या. कार्तिकचा जबरदस्त फॉर्म पाहता त्याची पुन्हा एकदा भारतीय संघात निवड झाली. एवढेच नव्हे तर, टी-20 फॉरमेटमध्ये पंतच्या तुलनेत दिनेश कार्तिकनं चांगली कामगिरी करून दाखवलीय. महत्वाचं म्हणजे, ऑस्ट्रेलिया येत्या ऑक्टोबरमध्ये रंगाणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकातही दिनेश कार्तिकची फर्स्ट च्वाइस विकेटकीपर म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.
हरभजन सिंह काय म्हणाला?
"ऋषभ पंतनं कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलीय. पंतची कामगिरी चांगली आहे. पण टी-20 फॉरमॅटमध्ये तो तितकी चांगली कामगिरी करू शकला नाही. दिनेश कार्तिकचा आलेख चढता आहे. कार्तिकनं चांगला खेळ दाखवला आहे. ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संघात खेळवण्याचा रोहित शर्माचा निर्णय योग्य आहे."
कार्तिकला संघाबाहेर ठेवणं चुकीचं
"कार्तिकचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला संधाबाहेर ठेवलं जाऊ शकत नाही. सध्या कार्तिकला संधी देणं गरजेचं आहे. पंतजवळ खूप वेळ आहे. पण कार्तिकजवळ फक्त एक किंवा दोन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिलाय. त्याच्याकडं खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत भारताला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे", असंही हरभजन सिंहनं म्हटलंय.
दोघांना संघात एकत्र स्थान मिळणं कठीण
आयपीएल 2022 नंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत कार्तिक आणि पंत दोघेही संघाचा भाग होते. परंतु, केएल राहुलच्या पुनरागमनामुळं दोन्ही खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये एकत्र जागा मिळवणं थोडं कठीण
हे देखील वाचा-