(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर विजय, भारताचं स्पर्धेतील आव्हान संपलं
Asia Cup 2022, PAK vs AFG : रोमांचक सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक विकेटनं पराभव केला आहे.
Asia Cup 2022, PAK vs AFG : रोमांचक सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक विकेटनं पराभव केला आहे. पाकिस्तानच्या विजयासह भारताचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये प्रत्येकी दोन दोन सामने जिंकत फायनलचं तिकिट मिळवलं आहे.
अफगाणिस्ताननं दिलेलं 130 धावांचं आव्हान पाकिस्ताननं अखेरच्या षटकात एक गडी आणि चार चेंडू राखून पार केलं. वेगवान गोलंदाज नसीम शाहनं दोन खणखणीत षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या विजयासह पाकिस्तानने फायनलच तिकिट पक्कं केले आहे.
पाकिस्ताननं नाणेफेकीचा कौल जिंकत अफगाणिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. इब्राहिम झद्रान याच्या 35 धावांच्या खेळीच्या बळावर अफगाणिस्तान संघानं निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 129 धावांपर्यंत मजल मारली होती. हजरतुल्ला झझाई, रहमानुल्ला गुरबज, करीम जनत, नजीबुल्लाह जद्रान आणि कर्णधार मोहम्मद नबी यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानकडून हॅरिस रऊफने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
अफगाणिस्ताननं दिलेल्या 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. कर्णधार बाबर आझम एकही धाव न काढता बाद झाला. त्यानंतर फखर जमानही तंबूत परतला. पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यावेली पुन्हा एकदा रिझवानने संयमी फलंदाजी केली. रिझवान बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव ढासळतोय असे वाटत होते. पण शदाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी सामना फिरवला. शदाब खानने 30 तर अहमदने 36 धावांची खेळी केली. याच वेळी मोक्याच्या क्षणी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत एकापाठोपाठ एक विकेट घेतल्या. अखेरच्या 6 चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी 12 धावांची गरज होती. आणि हातात फक्त एक विकेट... त्यावेळी गोलंदाज नसीम शाहने दोन खणखणीत षटकार मारत सामना जिंकून दिला. अफगाणिस्तानकडून फजल हक आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर राशिद खानने दोन विकेट घेतल्या.
पाकिस्तानची फलंदाजी
फलंदाजी | R | B | 4s | 6s |
मोहम्मद रिजवान | 20 | 26 | 1 | 1 |
बाबर आझम | 0 | 1 | 0 | 0 |
फखर जमान | 5 | 9 | 1 | 0 |
इफ्तिखार अहमद | 30 | 33 | 2 | 0 |
शदाब खान | 36 | 26 | 1 | 3 |
मोहम्मद नवाज | 4 | 5 | 1 | 0 |
आसिफ अली | 16 | 8 | 0 | 2 |
खुशदिल शाह | 1 | 3 | 0 | 0 |
हॅरिस रऊफ | 0 | 1 | 0 | 0 |
नसीम शाह नाबाद | 14 | 4 | 0 | 2 |
मोहम्मद हसनैन नाबाद | 0 | 0 | 0 | 0 |
अफगाणिस्तानची फलंदाजी
फलंदाजी | R | B | 4s | 6s |
हजरतुल्ला झझाई | 21 | 17 | 4 | 0 |
रहमानुल्ला गुरबज | 17 | 11 | 0 | 2 |
इब्राहिम झद्रान | 35 | 37 | 2 | 1 |
करीम जनत | 15 | 19 | 1 | 0 |
नजीबुल्लाह जद्रान | 10 | 11 | 0 | 1 |
मोहम्मद नबी | 0 | 1 | 0 | 0 |
अझमतुल्ला ओमरझाई नाबाद | 10 | 10 | 1 | 0 |
रशीद खान नाबाद | 18 | 15 | 2 | 1 |
मुजीब उर रहमान | ||||
फरीद अहमद | ||||
फजल हक |