Asia Cup 2022: पाच फलंदाजाच्या प्रदर्शनावर राहणार सर्वांची नजर; आशिया चषकात धावांचा पाऊस पाडण्याची शक्यता
Asia Cup 2022: यूएईमध्ये शनिवारपासून (27 ऑगस्ट) आशिया चषकाला सुरुवात होत आहे. तर, भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील महामुकाबला सामना 28 ऑगस्ट 2022 ला खेळला जाणार आहे.
Asia Cup 2022: यूएईमध्ये शनिवारपासून (27 ऑगस्ट) आशिया चषकाला सुरुवात होत आहे. तर, भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील महामुकाबला सामना 28 ऑगस्ट 2022 ला खेळला जाणार आहे. यावेळी आशिया चषकात सर्व संघांमध्ये असे अनेक स्टार फलंदाज आहेत, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. त्याचबरोबर हा फलंदाज स्पर्धेत सर्वाधिक धावाही करू शकतात. यंदाच्या आशिया चषक 2022 मध्ये सर्वाधिक धावा करू शकणारे पाच खेळाडू कोण आहेत? त्यांची यादीत पाहुयात
बाबर आझम
पाकिस्तानचा कर्णधार बाबरनं दमदार खेळीच्या जोरावर क्रिडाविश्वावर छाप सोडलीय. तो सध्या टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. बाबर टी-20 मध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यानं पाकिस्तानसाठी आतापर्यंत 74 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 45 च्या सरासरीनं 2 हजार 686 धावा केल्या आहेत. बाबरनं टी-20 मध्येही शतक झळकावले आहे. त्याची टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या 122 धावा इतकी आहे.
सुर्यकुमार यादव
भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या आशिया चषकात सुर्यकुमार यादवकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सुर्यकुमार यादवनं भारतासाठी आतापर्यंत 23 टी-20 आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 672 धावा केल्या आहेत. त्याची टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या 117 धावा इतकी आहे.
मोहम्मद रिझवान
आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान नेटमध्ये जोरदार सराव करत आहे. मागील टी-20 विश्वचषकात मोहम्मद रिझवाननं भारताविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला होता. यामुळं आशिया चषकातही त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रिझवाननं पाकिस्तानसाठी आतापर्यंत एकूण 56 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 50 च्या सरासरीनं 1 हजार 662 धावा केल्या आहेत. ज्यात एका शतकाचा समावेश आहे.
रोहित शर्मा
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माची जगभरातील तडाखेबाज फलंदाजामध्ये गणना केली जाते. आशिया चषकातही रोहित शर्माच्या बॅटमधून धावा निघण्याची शक्यता आहे. रोहित शर्मानं भारतासाठी आतापर्यंत 132 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 3 हजार 487 धावांची आवश्यकता आहे. ज्यात चार शतकांचा समावेश आहे.
शाकिब अल हसन
आशिया चषकात बांग्लादेशच्या संघाचं धुरा संभाळणारा स्टार ऑलराऊंडर शाकीब अल हसन यंदा बांग्लादेशला पहिल्यांदा चषक जिंकून देण्याचा उद्देशानं मैदानात उतरणार आहे. शाकीब अल हसननं बांग्लादेशकडून आतापर्यंत 99 टी-20 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 2 हजार 10 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटममध्ये दिर्घकाळ ऑलराऊंडरच्या क्रमवारीत अव्वल स्थानी राहिलेल्या शाकीब अल हसनला अजून एकही शतक झळकावता आलं नाही.
हे देखील वाचा-