एक्स्प्लोर

8 खेळाडू तिशी पार, धोनी म्हणतो वय नाही, फिटनेस महत्त्वाचा!!

स्वत: 37 वर्षांचा असलेला धोनी आणि निम्म्यापेक्षा जास्त तिशी पार केलेल्या सीएसकेच्या खेळाडूंनी आयपीएलचं जेतेपद पटकावलं.

मुंबई: तरुणांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी ट्वेण्टी क्रिकेटमध्ये, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने कमाल केली. स्वत: 37 वर्षांचा असलेला धोनी आणि निम्म्यापेक्षा जास्त तिशी पार केलेल्या सीएसकेच्या खेळाडूंनी आयपीएलचं जेतेपद पटकावलं. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. चेन्नईने याआधी 2010 आणि 2011 साली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 57 चेंडूंत आठ षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. 16 धावा करणाऱ्या अंबाती रायडूने विजयी चौकार ठोकला. अर्ध्यापेक्षा जास्त संघ तिशी पार सीएसकेच्या विजयाचं वैशिष्ट्य म्हणजे, धोनीचा संघातील 8 खेळाडूंचं वय हे जवळपास 30 पेक्षा जास्त आहे. स्वत: धोनी 36 वर्ष 11 महिन्यांचा म्हणजेच 37 वर्षांचा आहे. तर फायनलमध्ये धडाकेबाज नाबाद शतक ठोकणारा शेन वॉटसनही धोनीच्याच वयाचा आहे. धोनी आणि वॉटसन 36 वर्ष 11 महिन्यांचे आहेत. याशिवाय ड्वेन ब्राव्हो 34 वर्ष, ड्युप्लेसी 33 वर्ष, अंबाती रायुडू 32 वर्ष, सुरेश रैना 31 वर्ष, कर्ण शर्मा 30 वर्ष, रवींद्र जाडेजा 29 वर्ष सहा महिने म्हणजेच जवळपास 30 वर्ष, असे चेन्नईचे जवळपास 8 खेळाडू 30 किंवा 30 पेक्षा जास्त वयाचे आहेत. वय नाही फिटनेस महत्त्वाचा सामना संपल्यानंतर धोनीला खेळाडूंच्या वयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धोनीने वय नव्हे तर फिटनेस महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. धोनी म्हणाला, “आपण बऱ्याचदा वयाबद्दल बोलतो. मात्र वय नव्हे तर फिटनेस महत्त्वाचा आहे. रायुडू 33 वर्षांचा आहे, मात्र ते महत्त्वाचं नाही. कोणताही कर्णधार चपळ खेळाडू निवडतो, त्यावेळी तो 19-20 वर्षांचा आहे का हे पाहात नाही. त्यामुळे वय हे फक्त एक आकडा आहे”.  चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंचं वय शेन वॉटसन 36 वर्ष 11 महिने (37 वर्ष) महेंद्रसिंह धोनी 36 वर्ष 11 महिने (37 वर्ष) ड्वेन ब्राव्हो 34 वर्ष 9 महिने (35 वर्ष) फॅफ ड्युप्लेसी 33 वर्ष 10 महिने (34 वर्ष) अंबाती रायुडू 32 वर्ष 9 महिने (33 वर्ष) सुरेश रैना 31 वर्ष 6 महिने कर्ण शर्मा 30 वर्ष 7 महिने (31 वर्ष) रवींद्र जाडेजा 29 वर्ष 6 महिने शार्दूल ठाकूर 26 वर्ष 7 महिने दीपक चहर 25 वर्ष 10 महिने (26 वर्ष) लुंगसनी एन्गडी – 22 वर्ष 2 महिने

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
बुमराह-हार्दिकसह स्टार खेळाडू दुखापतीत, पण BCCIकडे 16 महिन्यांपासून डॉक्टर नाही! VVS लक्ष्मणने सांगितलं नेमकं काय घडलं?
बुमराह-हार्दिकसह स्टार खेळाडू दुखापतीत, पण BCCIकडे 16 महिन्यांपासून डॉक्टर नाही! VVS लक्ष्मणने सांगितलं नेमकं काय घडलं?
सामना संपला, अन् मैदानात राडा, 2 भारतीय खेळाडू भिडले, एक बॅट घेऊन मारण्यासाठी धावला, नेमकं काय घडलं? पाहा 'तो' 2 मिनटांचा VIDEO
सामना संपला, अन् मैदानात राडा, 2 भारतीय खेळाडू भिडले, एक बॅट घेऊन मारण्यासाठी धावला, नेमकं काय घडलं? पाहा 'तो' 2 मिनटांचा VIDEO
Rohit Sharma 2027 ODI World Cup : आज हो म्हणतात, उद्या नाही! BCCI ने रोहितसोबत खेळ थांबवावा; मुंबईच्या मोठ्या खेळाडूने वर्ल्डकपआधी निवड समितीला सुनावलं
आज हो म्हणतात, उद्या नाही! BCCI ने रोहितसोबत खेळ थांबवावा; मुंबईच्या मोठ्या खेळाडूने वर्ल्डकपआधी निवड समितीला सुनावलं

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget