एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एकाच मोसमात चार सुपरसीरिज खिशात, किदंबी श्रीकांतचं घवघवीत यश

जागतिक बॅडमिंटनच्या इतिहासात आजवर लिन डॅन, ली चॉन्ग वेई आणि चेन लॉन्ग या तिघांनीच एका मोसमात चार सुपर सीरीज जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. भारताच्या किदम्बी श्रीकांतनं फ्रेन्च ओपन जिंकून त्या तिघांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. साहजिकच एक भारतीय बॅडमिंटन

इंडोनेशियन ओपन...  ऑस्ट्रेलियन ओपन... डेन्मार्क ओपन...  आणि आता फ्रेन्च ओपन सुपर सीरीजच्या या विजेतेपदानं किदम्बी श्रीकांतला थोरामोठ्यांच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे. एकाच मोसमात एकदोन नाही, तर चार-चार सुपर सीरीजची विजेतीपदं पटकावणारा किदम्बी श्रीकांत हा जगातला केवळ चौथा बॅडमिंटनवीर ठरला आहे. जागतिक बॅडमिंटनच्या इतिहासात आजवर लिन डॅन, ली चॉन्ग वेई आणि चेन लॉन्ग या तिघांनीच एका मोसमात चार सुपर सीरीज जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. भारताच्या किदम्बी श्रीकांतनं फ्रेन्च ओपन जिंकून त्या तिघांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. साहजिकच एक भारतीय बॅडमिंटनवीर या नात्यानं एकाच मोसमात सर्वाधिक सुपर सीरीज जिंकण्याचा पराक्रम श्रीकांतच्या नावावर जमा झाला. भारताची फुलराणी सायना नेहवालचा एकाच मोसमात सर्वाधिक तीन सुपर सीरीज जिंकण्याचा विक्रम त्यानं मोडीत काढला. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की, हा सुपर सीरीज प्रकार आहे तरी काय? मग ऐका... बॅडमिंटनच्या दुनियेत सुपर सीरीज प्रीमियर आणि सुपर सीरीज स्पर्धांना ऑलिम्पिक आणि जागतिक विजेतेपद स्पर्धेखालोखाल  महत्त्व आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची खास मान्यता लाभलेल्या सुपर सीरीजचा दर्जा हा सर्वोच्च मानला जातो. बॅडमिंटनच्या एका मोसमात किमान बारा-तेरा देशांमध्ये मिळून चौदा सुपर सीरीजचं आयोजन करण्यात येतं. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचं प्रत्येक सुपर सीरीजवर बारीक लक्ष असतं. दर तीन वर्षांनी प्रत्येक सुपर सीरीजचा आढावा घेऊन त्याचं पुन्हा आयोजन व्हावं की, नाही याचा कठोर निर्णय फेडरेशन घेत असते. त्यामुळं सुपर सीरीजचा दर्जा टिकून राहतो. त्यामुळंच सुपर सीरीजच्या परिक्षेत एकाच मोसमात चार-चारवेळा सर्वोत्तम ठरणं हे तुम्ही चॅम्पियन असल्याचं दाखवून देतं. आणि किदम्बी श्रीकांत हा जागतिक बॅडमिंटनला मिळालेला नवा चॅम्पियन आहे. सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीनं गेल्या पाच वर्षांत भारतीय बॅडमिंटनला जगात नवा आदर मिळवून दिला आहे. पण किदम्बी श्रीकांतनं यंदाच्या मोसमात बजावलेल्या कामगिरीनं भारतीय बॅडमिंटनविषयीचा आदर आणखी वाढला आहे. एका मोसमात चार सुपर सीरीज जिंकायच्या... त्यापैकी डेन्मार्क आणि फ्रेन्च ओपनचं विजेतेपद तर लागोपाठ दोन आठवड्यांत पटकावायचं हे श्रीकांत सुपर फॉर्ममध्ये असल्याचं लक्षण आहे. डेन्मार्क ओपन आणि फ्रेन्च ओपनच्या फायनलवर नजर टाकली तर त्याचा सुपर फॉर्म म्हणजे काय, याची कल्पना यावी. डेन्मार्क ओपनमध्ये त्यानं ली ह्यूनला २५ मिनिटांत गाशा गुंडाळायला लावला, तर फ्रेन्च ओपनमध्ये त्यानं केन्टा निशिमोटोचा ३५ मिनिटांत फडशा पाडला. किदम्बी श्रीकांतच्या सुपर फॉर्मला त्याच्या सुपर फिटनेसचीही जोड लाभली आहे. दर दहा दिवसांनी जगातल्या एका नव्या शहरात लॅण्डिंग करून, सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याची सवय ही सुपरमॅनचीच असू शकते. म्हणूनच जाणकारांना त्यानं वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी बजावलेल्या कामगिरीचं कौतुक वाटतं. भारतीय बॅडमिंटननं याआधीही प्रकाश पडुकोण आणि पुलेला गोपीचंद यांच्यासारखे चॅम्पियन जगाला दिले आहेत. पण भारतीय बॅडमिंटनवीर हे तिशीच्या आसपास परिपक्व होत असल्याचा आजवरचा अनुभव होता. किदम्बी श्रीकांतनं मात्र पंचविशीच्या आतच घवघवीत यश मिळवून भारतीय बॅडमिंटनविषयीचं जगाचं कुतूहल वाढवलं आहे. किदम्बी श्रीकांतच्या यंदाच्या मोसमातल्या पराक्रमानं जागतिक बॅडमिंटनमधली त्याची ओळखही बदलली आहे. यंदाच्या मोसमाआधी बॅडमिंटनच्या दुनियेत त्याची जायंटकिलर अशी ओळख होती.  वर्ल्ड नंबर वन व्हिक्टर अॅक्सलसन असेल, ऑलिम्पिक चॅम्पियन चेन लॉन्ग असेल किंवा वर्ल्ड नंबर टू सॉन वॅन हो... त्यांच्यावर श्रीकांतनं मिळवलेला प्रत्येक विजय हा त्याच्या गुणवत्तेची केवळ झलक दाखवणाराच होता. पण यंदाच्या मोसमात चार सुपर सीरीजच्या विजेतीपदांनी किदम्बी श्रीकांतला सुपर चॅम्पियन म्हणून जगासमोर आणलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSpecial Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Embed widget