Abdul Razzaq on Aishwarya Rai : पाकिस्तानच्या अब्दुल रझाकने पार लाज सोडली; थेट ऐश्वर्या रायशी हलकट तुलना अन् बाजूला शाहीद आफ्रिदी, उमर गुल दात काढत राहिले
Abdul Razzaq on Aishwarya Rai : अब्दुल रझाकच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. सोशल मीडिया यूजर्स अब्दुल रझाकवर तुटून पडले आहेत. शोएब अख्तरनेही रझाकचे कान उपटत तोफ डागली आहे.
Abdul Razzaq on Aishwarya Rai : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकचा व्हिडिओ (Abdul Razzaq on Aishwarya Rai Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अब्दुल रज्जाक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तुलना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत करत आहे. अब्दुल रज्जाकच्या वक्तव्यानंतर क्रिकेट जगताने मान खाली घातली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हेतूबद्दल बोलताना अब्दुल रझाक म्हणाला की, जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्ही ऐश्वर्या रायशी लग्न कराल आणि त्यानंतर एक सुंदर मूल जन्माला येईल, तर असे कधीही होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचे हेतू सुधारावे लागतील.
Shamefull Disgusting
— Waleed Rauf (@WaleedRauf20) November 13, 2023
Ye hai hamaray Senior Players Hud hai
Bhai Ap kese Aishwariya Rai ko degrade kar sakte ho Cricketer ho Cricket me reh kr example de
and Dukh is cheez ka kisi ex cricketer ne roka bi nae ye kya bol diya#Abdulrazzaq
pic.twitter.com/7juuK8RwG0
अब्दुल रझाकच्या हलकट टिकेनंतर अब्दुल रझाकवर पाकिस्तानमधून सडकून टीका सुरु झाली आहे. अब्दुल रझाक जेव्हा हे बोलत होता तेव्हा त्याच्यासोबत शाहिद आफ्रिदीसह अनेक क्रिकेटर्स उपस्थित होते.
I condemn Abdul Razzaq's statement about Aishwarya Rai! You cannot talk about someone's character in that manner and try to tarnish their image. Razzaq bhai always talks about niyat but his statement was uncalled for and he should apologise for it. It's a small mindset 🙏🏼 #CWC23 pic.twitter.com/3X40dK3cGL
— Farid Khan (@_FaridKhan) November 13, 2023
अब्दुल रझाकच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. सोशल मीडिया यूजर्स अब्दुल रझाकवर तुटून पडले आहेत. शोएब अख्तरनेही रझाकचे कान उपटत तोफ डागली आहे.
This is the mentality of our cricketers. Shame on you #AbdulRazzaq for commenting on #AishwaryaRai
— Arzoo Kazmi|आरज़ू काज़मी | آرزو کاظمی | 🇵🇰✒️🖋🕊 (@Arzookazmi30) November 14, 2023
Shameful example given by #AbdulRazzak pic.twitter.com/iENn1H6DWV
काय म्हणाले शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर?
सडकून टीका सुरु झाल्याने आता शाहीद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे. शाहिद आफ्रिदी म्हणाला की, कार्यक्रम सुरू होता, आम्ही स्टेजवर बसलो होतो. अब्दुल रझाक तिथे काहीतरी बोलला, तो काय बोलला ते मला समजले नाही, त्यामुळे मी तसा हसत होतो. तो म्हणाला की मी लगेच अब्दुल रझाकला मेसेज करून सर्वांना सॉरी बोल असे सांगणार आहे. हा एक वाईट विनोद होता, जो होऊ नये.
I highly condemn the inappropriate joke/comparison made by Razzaq.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 14, 2023
No woman should be disrespected like this.
People seated beside him should have raised their voice right away rather than laughing & clapping.
शोएब अख्तर म्हणाला की मी अब्दुल रज्जाकच्या अनुचित विनोदाचा किंवा तुलनात्मक विधानाचा निषेध करतो. कोणत्याही महिलेचा अपमान होता कामा नये. रावळपिंडी एक्स्प्रेसने असेही म्हटले की, शेजारी बसलेल्या लोकांनी हसून टाळ्या वाजवण्याऐवजी आवाज उठवायला हवा होता.