एक्स्प्लोर

मिस्टर 360 चा गुडबाय, एबी डिव्हिलियर्सची धक्कादायक निवृत्ती!

डिव्हिलियर्सने अचानक घेतलेल्या या निवृत्तीमुळे क्रिकेट वर्तृळात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने धक्कादायकरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. डिव्हिलियर्सने अचानक घेतलेल्या या निवृत्तीमुळे क्रिकेट वर्तृळात एकच खळबळ उडाली आहे. डिव्हिलियर्सनं 2004 साली दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या 14 वर्षांच्या कारकीर्दीनंतर आपण थकलो असल्याची प्रामाणिक कबुली त्यानं दिली. डिव्हिलियर्सनं 114 कसोटी, 228 वन डे आणि 78  ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. डिव्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय का घेत आहोत, हे एका व्हिडीओद्वारे ट्विटरवर जाहीर केलं. "मी आता कंटाळलो आहे. शिवाय तरुणांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे या क्षणापासूनच मी क्रिकेटला अलविदा करत आहे" असं डिव्हिलियर्स म्हणाला. डिव्हिलिअर्सला भारतात यायचं आहे?   डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो. सध्या आरसीबी किंवा डिव्हिलियर्सला मोठी कामगिरी करता आली नाही. मिस्टर 360 मिस्टर 360 या नावाने ओळखला जाणारा डिव्हिलियर्स, क्रिकेटच्या मैदानातील झंझावात म्हणून ओळखला जात असे. डिव्हिलियर्सने 114 कसोटी सामने, 228 वन डे सामने आणि 78 ट्वेण्टी-20 सामन्यांमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 22 शतकं आणि 46 अर्धशतकं त्याच्या नावावर जमा आहेत. तर एकदिवसीय सामन्यात त्याने 25 शतकं आणि 53 अर्धशतकं ठोकली आहेत. याशिवाय ट्वेण्टी 20 क्रिकेटमध्ये त्याने दहा अर्धशतकं केली आहे. एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वन डे कामगिरी सामने – 228 धावा – 9577 शतकं – 25 अर्धशतकं – 53 कसोटी कामगिरी सामने – 114 धावा – 8765 शतकं – 22 अर्धशतकं – 46 टी-20 कामगिरी सामने – 78 धावा – 1672 शतकं – 0 अर्धशतकं - 10 संबंधित बातम्या ऑलराऊंडर एबी डिव्हिलयर्सबाबत 10 इंटरेस्टिंग गोष्टी   डिव्हिलिअर्सला भारतात यायचं आहे? 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंका संपलं असं वाटत होतं… पण सोनल-डिकवेलाने सगळा खेळच फिरवला! 90/5 वरून थेट 214... भारताची डोकेदुखी वाढवली
श्रीलंका संपलं असं वाटत होतं… पण सोनल-डिकवेलाने सगळा खेळच फिरवला! 90/5 वरून थेट 214... भारताची डोकेदुखी वाढवली
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 1st Test : कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला
कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला
Most NO-balls In Test Match : कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला हादरवणारा विक्रम! जेव्हा एका सामन्यात टाकले तब्बल 103 नो-बॉल, नेमकं काय घडलं होतं?
कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला हादरवणारा विक्रम! जेव्हा एका सामन्यात टाकले तब्बल 103 नो-बॉल, नेमकं काय घडलं होतं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget