एक्स्प्लोर

37th National Games : संयुक्ताची लक्षवेधी कामगिरी, जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राची एक नंबर कामगिरी

संयुक्ता काळे आणि रिचा चोरडिया यांच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये शनिवारी महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजवले. अ

37th National Games : संयुक्ता काळे आणि रिचा चोरडिया यांच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये शनिवारी महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजवले. अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवली. यात संयुक्ताने एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी दोन पदके जिंकली. तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये संयुक्ता काळे पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके मिळवून वर्चस्व गाजवले. रिचाने आज दोन कांस्य पदके पटकावली. 

मापूसा येथील पेड्डेम इनडोअर स्टेडियमवर झालेल्या महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्समधील क्लब प्रकारात महाराष्ट्राच्या संयुक्ता काळेने सुवर्णपदकाला गवसणी घालताना २४.३० गुण मिळवले, तर सहकारी रिचा चोरडियाने २०.३० गुण मिळवत कांस्य पदक प्राप्त केले. हरयाणाच्या लाइफ अडलखाला (२३.११ गुण) रौप्य पदक मिळाले. रिबन प्रकारात संयुक्ताने २३.१५ गुण मिळवत रौप्य पदक मिळवले. तर रिचाने २०.१५ गुणांच्या सहाय्याने कांस्य पदक पटकावले. हरयाणाच्या लाइफने (२३.७० गुण) सुवर्ण पदक मिळवले. 

महिलांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील फ्लोअर एक्सरसाइज प्रकारात इशिता रेवाळेला (११.१०० गुण) कांस्य पदक मिळवण्यात यश मिळाले. पश्चिम बंगालच्या प्रणती दासला (११.५३३ गुण) सुवर्ण आणि ओडीशाच्या प्रणती नायकला (११.४०० गुण) रौप्य पदक मिळाले. बॅलन्सिंग बिम प्रकारात इशिता रेवाळेला (१०.००० गुण) पाचव्या आणि रिद्धी हत्तेकरला (९.९६७ गुण) सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील टेबल व्हॉल्ट प्रकारात आर्यन दवंडेला (१२.८३४ गुण) सहावा क्रमांक, तर सिद्धांत कोंडेला (१२.३६७ गुण) आठवा क्रमांक मिळाला. हॉरिझंटल बार प्रकारात सिद्धांतला सहावा क्रमांक मिळाला. 

यश स्वर्गवासी आजोबांना समर्पित! -संयुक्ता काळे
तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके मिळवणाऱ्या संयुक्ता काळेने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक पूजा आणि मानसी सुर्वे तसेच आई-वडिलांना दिले. परंतु कारकि‍र्दीत सदैव पाठबळ देणाऱ्या आणि नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या आजोबांना तिने आपले यश समर्पित केले. 
संयुक्ता ठाण्याच्या एम्बर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बारावी इयत्तेत शिकत आहे. यंदा तिने दुसऱ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. “मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला एकच सुवर्ण पदक मिळाले होते. पण ते माझ्यासाठी खास ठरले होते. कारण ते माझ्या कारकीर्दीतील शंभरावे सोनेरी यश होते. पण यंदा मोठे यश मिळाले, याचा अभिमान वाटतो,” असे संयुक्ताने सांगितले. 

“यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा अनुभव अतिशय चांगला आहे. गोव्याने उत्तम आयोजन केले आहे. इतक्या कमी वेळात इतके मोठे स्टेडियम सज्ज केले आहे. त्यात एरोबिक्स, एक्रॉबेटिक्स, तालबद्ध आणि कलात्मक अशा चारही प्रकारचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्य उभारणे, हे आव्हान त्यांनी उत्तम पेलले. ते सर्वच क्रीडपटूंसाठी प्रेरणादायी ठरले. गोव्याच्या क्रीडारसिकांनी स्पर्धेला अप्रतिम प्रतिसाद दिला. महाराष्ट्र सोडून अन्यत्र आहोत, असे  वाटतच नव्हते,” असे संयुक्ता यावेळी म्हणाली.

कोमल वाकळे सुवर्णपदकाची मानकरी

कोमल वाकळेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील महिलांच्या ८७ किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले. कोमलने स्नॅचमध्ये ९३ किलो तर क्लीन-जर्कमध्ये ११२ किलो असे एकूण २०५ किलो वजन उचलले. कोमलने स्नॅचमध्ये तिसऱ्या प्रयत्नात ९६ किलो वजन उचलण्याच्या  केलेला प्रयत्न अपयशी ठरला. कर्नाटकच्या उषा बीएनने २०३ किलो (स्नॅच ९५, क्लीन-जर्क १०८) वजन उचलून रौप्य पदक मिळवले, तर हरयाणाच्या राखीने १९६ किलो (स्नॅच ८७, क्लीन-जर्क १०९) वजन उचलून कांस्य पदक पटकावले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget