पैठणीला केवळ भारतातच नाही तर विदेशातही ओळख आहे. विणकरांच्या या कलेमुळेच आता पारंपरिक पैठणीबरोबरच नवनवीन डिझाईनच्या पैठण्या बघायलाही मिळतात.
2/5
3/5
पदरावरचे ते जरतारी मोर, शाही थाटाचे काठ आणि रंगाची झळाळी.. आयुष्यात एकदातरी अशी जरतारी पैठणी नेसण्याची इच्छा प्रत्येक महिलेच्या मनात असते. एरवी मोराच्या डिझाईनच्या, वेगवेगळ्या रंगांच्या, आकर्षक नक्षीकाम केलेल्या पैठणी तुम्ही पाहिल्या असतील. मात्र पैठणीवर इतर कलाकृतींपेक्षा आपल्या पतीचाच फोटो असल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का?
4/5
येवला म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती पैठणी... जवळपास सगळ्याच महिलांची अगदी जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे पैठणी... येवल्यामध्ये एका भावाने आपल्या बहिणीसाठी मात्र एक आगळीवेगळीच पैठणी विणली आहे.
5/5
आपल्या बहिणीसाठी ही आगळी पैठणी गिफ्ट केलीय भाऊ जगदीश भालोरेने. एकाच किमतीत या पैठणीचे अनेक फायदे आहेत. लग्न समारंभाला, पूजेला, सणांना ही पैठणी नेसता येईल तर एरवी फ्रेम म्हणूनही ती ठेवता येईल.